ध्वनी प्रदूषण,मोटार सायकल बेलगाम चालवणाऱ्यांवर लोणावळा शहर पोलीस कारवाई का नाही करत? ऍड माधव भोंडे यांचा संतप्त सवाल





मावळ मराठा न्युज -लोणावळा,सुमारे दीड महिन्या पूर्वी आपणास आणि पोलीस निरीक्षक ह्यांना पत्र लिहले होते. परवा फोन पण केला होता. पोलिस डिपार्टमेंट कडून अजुनही कुठलीही कृती करताना दिसत नाही. कायदा मोडणारे कायदा धाब्यावर बसवून मोकाट सुटले आहेत. संपूर्ण समाजाला धाब्यावर बसवून समाज,कायदा, पोलीस यंत्रणा आमचे काय वाकडे करतात ? ते बघु आशा गुर्मी मध्ये ध्वनी प्रदूषण करीत त्यांच्या मोटारसायकल बेलगाम चालवित आहेत. मोटारसायकलच्या वेगामुळे सामान्य माणसाला ना त्यांचे चेहरे दिसतात ना मोटारसायकल चे नंबर प्लेट दिसतात.पण चालवणारे मोटारसायकल स्वार लहान मुले असल्याचे दिसून येते. समाजाला एवढे वेठीस धरले जात असताना पोलीस यंत्रणा इतकी निद्रिस्त असावी आणि समाज एवढा नपुंसक असावा ही भयावह आणि चिंताजनक बाब आहे. कोणीही उठावे रात्री बेरात्री, दिवसा ढवळा मस्ती मध्ये आत्यंतिक कर्कश आवाजात बेलगाम आणि बेमुर्वतखोरपणे दुचाकी चालवून विद्यार्थी, पालक, रुग्ण, वृद्ध, आणि संपूर्ण समाजाची शांतता भंग करावी ही शरमेची गोष्ट आहे. कायदा आणि सुप्रीम कोर्टाने अनेक निवाडे मधून मार्गदर्शक सुचना आहेत. पण पोलीस यंत्रणा काय आणि समाज काय डोळ्यावर पट्टी बांधुन आणि कानात बोळे कोंबून हा जुलूम सहन करतोय. आमचे पत्रकार बंधु आणि नवनिर्वाचित अध्यक्ष आणि नगरसेवक पण ह्या गोष्टी कडे दुर्लक्ष करत आहेत. फक्त १० -१२ लोक संपूर्ण शहराला दिवसा रात्री जेरीस आणतात ही शरमेची बाब आहे. खडबडून जागे होऊन ,कायदा हातात घेऊन संपूर्ण समाजाला वेठीस धरणाऱ्या १० -२२ लोकांचे विरुद्ध आवाज उठवत नसतील तर येणाऱ्या काळाची पाउले आपण ओळखली पाहिजेत.असेही श्री माधव भोंडे यांनी मावळ मराठा न्युज शी बोलताना सांगितले.



