लायन्स क्लब ऑफ लोणावळा–खंडाळा यांचा नांगरगांव येथील आशाघर येथे ‘हंगर अॅक्टिव्हिटी’उपक्रम संपन्न







मावळ मराठा न्युज -लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा–खंडाळा यांच्या वतीने नुकताच नांगरगांव येथील आशाघर येथे ‘हंगर अॅक्टिव्हिटी’ अंतर्गत अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. हा उपक्रम स्व. मनसीबाई एन. जैन (मुलुंड) यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आला होता.या उपक्रमांतर्गत आशाघर येथील निराधार व गरजू मुलाना अन्नदान करण्यात आले. समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याच्या लायन्स क्लबच्या सामाजिक बांधिलकीचे हे एक महत्त्वाचे उदाहरण ठरले.या वेळी क्लबच्या अध्यक्षा लायन कांता ओसवाल, सचिव लायन निराली नालेकर, कोषाध्यक्ष लायन अश्विनी कदम, तसेच लायन डॉ. पोपट एम. ओसवाल आणि लायन अभय जैन उपस्थित होते.लायन्स क्लबच्या या उपक्रमाबद्दल आशाघर व्यवस्थापनाने आभार व्यक्त केले.



