प्रतिभा कॉलेज चिंचवड व क्विक हिल कंपनीच्या वतीने सायबर वॉरिअर्स द्वारा सायबर गुन्हे विषयक लोणावळ्यात जनजाग्रुति मोहीम

मावळ मराठा न्युज :-लोणावळा,सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा उपक्रम वर्षभर राबविला जातो त्या अंतर्गत महाराष्ट्रात सायबर क्राईम पोलीस यांच्या सायबर सुरक्षा अभियानांतर्गत क्विक हिल कंपनी च्या सहकार्याने प्रतिभा कॉलेज चिंचवड चे विद्यार्थी सायबर वॉरियर्स म्हणून जनजागृतीचे कार्य करत आहेत.याच अनुषंगाने लोणावळ्यातील शाळा कॉलेज व विविध संघटना मधून सध्या वाढते सायबर गुन्हे विषयक नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? या विषयी जनजागृती केली जात आहे.आजची तरुण पिढी मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करत आहेत इंटरनेटच्या जगात आपल्याला एका क्लिकवर सर्व माहिती मिळत असली तरी त्याच्या चुकीच्या वापराने अनेक दुष्परिणामाला सामोरे जावे लागते. मोबाईल द्वारा चुकीच्या लिंक ओपन करणे किंवा ओटीपी शेअर करणे मुलींच्या फोटोचा गैर वापर करणे ऑनलाइन आर्थिक व्यवहार फसवणूक कशी होते?याबाबत कोठे तक्रार करावी?अशा विविध सुरक्षेविषयी सायबर सेक्यूरिटीची जनजागृती वॉरियर्स द्वारा माहिती दिली जात आहे. लोणावळ्यात या सायबर सुरक्षा मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत असून या सायबर वॉरियर्स ने लोणावळ्यातील सर्व शाळा, तसेच ज्येष्ट नागरिक संघ,संपर्क बालग्राम, अशा विविध ठिकाणी याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.या सायबर जन जागृती मध्ये प्रतिभा महाविद्यालयातील लोणावळा शहरातील विद्यार्थी पी आर डायरेक्टर बतुल परावाला ,मानसी प्रदीप वाडेकर ,जोश्वा रिबेरो , श्रावणी सावंत या शिक्षिका हर्षिता वन्चानि व उज्वला बोरोले, सुप्रिया गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page