लायन्स क्लब ऑफ लोणावळा,खंडाळा यांचा वतीने रक्तदान शिबिर संपन्न ,२५३, बाटल्या संकलीत


मावळ मराठा न्यूज़ :- लोणावळा नवनिर्वाचित अध्यक्ष लायन ॲड. प्रफुल्ल्ल लुंकड ह्यांच्या नेतृत्वातलायन्स कल्ब लोनावाला खंडाळा आणि डेला रिसोर्ट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर, मेडिकल चेकअप, डोळे चेकअप आणि डेंटल चेकअप कॅम्प आयोजित करण्यात आला .ह्यावेळेस लायन डाॅ. दिलीप सुराणा, लायन डाॅ. पी. एम. ओसवाल, लायन डाॅ. लीना पाॅन, मनशक्ति चे डाॅ. सुहास गोसावी, डाॅ. निधि टाटीया. संजम ओसवाल, भवांशी ओसवाल, डाॅ. नरेश पाटिल हे उपस्थित होते. ह्या सर्व डॉक्टर्स सहित नवनिर्वाचित अध्यक्ष लायन ॲड. प्रफ्फुल लुंकड, लायन संगिता लुंकड, लायन प्रितम लुंकड. लायन मनोज लुंकड, लायन सीमा पारख, लायन विरल गाला, लायन दिपाली गाला, लायन अभय जैन,लायन कांता ओसवाल, लायन राजु शिंदे, लायन कोमल शिंदे, लायन साजीयाभाभी, लायन देवल पारेख, लायन चार्मी पारेख, लायन आशिष पॉन, लायन देवेंद्र नाळेकर, निराली नाळेकर, ह्यांचा डेला रिसोर्ट कडुन यथोचित सन्मान करण्यात आला.रक्तदान २५३, डोळे चेकअप १२६, डेंटल चेकअप ५९ आणि मेडिकल चेकअप १०७आणि सर्व रक्तदात्यांना लायन्स कल्ब लोनावाला खंडाळा कडुन ५ लाखांचा अपघाती विमा खजिनदार लायन प्रकाश जैन कडुन भिंतीवरील घड्याळ भेट स्वरूप प्रदान करण्यात आले. डेला रिसोर्ट चे डिरेक्टर लायन तरुण यांचा यथोचित सत्कार अध्यक्ष लायन प्रफुल्ल कङुन सन्मान चिन्ह भेट प्रदान करण्यात आली. त्यावेळेस डेला रिसोर्ट चे सी.ई.ओ रेमंड ईरानी,संपुर्ण एच.आर. टिम आणि सदस्य उपस्थित होते.




