शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने वडगाव मावळचे नायब तहसीलदार यांना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई मागणी



मावळ मराठा न्यूज : वडगाव,मावळ तालुक्यातील अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेती व वादळी वाऱ्यासह पावसाने शेती व घरांचे नुकसान मा्वळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरीक व शेतकऱ्यांचे खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदरील नुकसान भरपाईचे पंचनामे लवकरात लवकर करून मावळ तालुक्यातील शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांना योग्य तो मोबदला देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मावळ तालुक्याच्या वतीने आज वडगाव मावळचे नायब तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, महिला आघाडी जिल्हासंघटीका शैलाताई खंडागळे, माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकुर, तालुका संघटक शांताराम भोते, मदन शेडगे, अशोक निकम, उपतालुकाप्रमुख सोमनाथ कोंडे, एकनाथ जांभूळकर, किसन तरस, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, तालुका समन्वयक रविंद्र गायकवाड, अनिल ओव्हाळ, सल्लागार मारूती खोले, मा शहरप्रमुख राजेंद्र नवले, लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर, विभाग प्रमुख योगेश काकरे, माजी प्रभाग प्रमुख शंकर नाणेकर व तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.




