जय आनंद ग्रुपच्यावतीने समाजभूषण पुरस्कार रमणलाल लुंकड यांना तर मानव सेवा पुरस्कार सतीश बनवट यांना प्रदान

मावळ मराठा न्युज -पुणे,दि. २७ जानेवारी २०२६ रोजी जय आनंद ग्रुप,पुणे आयोजित “समाजभूषण पुरस्कार” व “जय आनंद मानव सेवा पुरस्कार” सोहळा मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. यावेळी समाजसेवेच्या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.जय आनंद ग्रुप,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित “समाजभूषण पुरस्कार” व “मानव सेवा पुरस्कार” सोहळा पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साही वातावरणात संपन्न झाला.या समारंभात जेष्ठ समाजसेवक आणि उद्योगपती रमणलाल लुंकड यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले. तर सतीश बनवट यांना मानव सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी आमदार उल्हास पवार,खासदार मेधाताई कुलकर्णी,उद्योगपती संजीव शहा आदीं मान्यवर यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला. जय आनंद ग्रुपचे अध्यक्ष नितीन ओस्तवाल, कार्याध्यक्ष गणेश कटारिया,सचिव, आनंद कोठारी व खजिनदार,दिलीप धोका, तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य,समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती,देणगीदार व कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.उपस्थित मान्यवर पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व समाजसेवा हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय असल्याचे सांगून जय आनंद ग्रुपच्या या प्रयत्नांची प्रशंसा केली.तसेच संस्थेच्या सामाजिक कार्याचे खूप कौतुक केले. जय आनंद ग्रुप,पुणेच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिष्टी कुचेरिया यांनी केले तर आभार सुधीर मुथा यांनी मानले. साप्ताहिक मावळ नागरिक,एमएन न्युज आणि मावळ मराठा न्युज परिवाराच्या वतीने रमणलाल लुंकड यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page