एकलव्य फौंडेशन आणि CFTI यांच्या संयुक्त विद्यमाने १३ रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पनवेल संपन्न


मावळ मराठा न्यूज :- लोणावळा, दिनांक ८ मे रोजी एकलव्य फौंडेशन आणि CFTI यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप शिबीर भैरवनाथ मंदिर, देवघर येथे आयोजित केले होते. या शिबिरात ज्या नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया सांगण्यात आली होती अश्या ५६ नागरिकांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून देणार असे एकलव्य फौंडेशन च्या वतीने कळविण्यात आले होते त्यातील २१ नागरिक प्रथम आपण शस्त्रक्रियेसाठी नेले असता त्यांतील १३ नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे करण्यात आली. तसेच उरलेले ८ नागरिकांची तपासणी केली असता त्यांना बीपी, शुगर, इ. असल्याने पुढील वेळी त्यांना करून घेऊ असे तेथील डॉक्टरांनी कळविले.या शस्त्रक्रिया साठी मार्गदर्शक ठरले ते श्री राजेश खंडेलवाल, श्री ओंकार परांजपे आणी एकलव्य फौंडेशन चे प्रवीण देशमुख, ओंकार पवार, विकास धोत्रे, विजय देशमुख, अजय सुरवडकर, अविनाश देसाई, किरण विटेकर, महादेव भवर, विठ्ठल जाधव आदींनी परिश्रम घेतले.




