कामशेत येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने “होऊ दया चर्चा”ला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद


मावळ मराठा न्यूज़ :-कामशेत,शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्य सरकारच्या बोलघेवड्या योजना आणि फसव्या भुलथापांचं पितळं उघडं पाडण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर सुरु करण्यात आलेला ” होऊ दया चर्चा ” हा कार्यक्रम शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिनभाऊ आहिर यांच्या मार्गदर्शनानुसार कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात व वडगाव मावळ या ठिकाणी पोटोबा महाराज मंदिर चौकात शनिवार दिनांक ७ आक्टोबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख ॲड मा श्री गौतम चाबुकस्वार विधानसभा संपर्कप्रमुख मा श्री प्रभाकर पवार, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष भाऊ ठोंबरे, महिला आघाडी पुणे जिल्हा संघटीका सौ शैलाताई खंडागळे, तालुका संघटक अमित कुंभार, उपतालुकाप्रमुख डाॅ विकेश मुथा, तालुका सल्लागार मारूती भाऊ खोले, युवासेना तालुका अधिकारी विजय तिकोणे, समन्वयक अनिल ओव्हाळ, लोणावळा शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, कामशेत शहरप्रमुख सतिश इंगवले, वडगाव शहरप्रमुख राहुल नखाते, कामशेत शहर उपशहरप्रमुख सुदेश लाड, मा शहरप्रमुख गणेश भोकरे, मा शहरप्रमुख तानाजी वाघवले, युवासेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, वडगाव शहरसंघटक संतोष शिंदे, कामगार सेनेचे ज्ञानदेव कदम, जेष्ठ शिवसैनिक दत्ताभाऊ दौंडे, मा सरपंच वैशालीताई इंगवले, सदस्या अंजनाताई मुथा, शहरसंघटिका उषाताई इंगवले,सुलोचनाताई चव्हाण, प्रतिमाताई ढोरे, उपशहरप्रमुख संतोष ढोरे, माणिक चव्हाण, मा शहरप्रमुख नागेश चव्हाण, संग्राम ढोरे, अविनाश रवणे, मनोहर फाटक , सागर वारुळे, देवा कांबळे,राज चौधरी,अर्जुन कदम,यश कदम, नवनाथ कदम,तसेच या कार्यक्रमास स्थानिक कामशेत शहर व वडगाव शहरातील नागरीक व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




