रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या वतीने नांगरगाव येथील नगरपरिषदेच्या शाळेसाठी बांधलेल्या स्वच्छता गृहाचे लोकार्पण






मावळ मराठा न्युज – लोणावळा,दिनांक ३० जानेवारी २०२६ जानेवारी रोजी रोटरी क्लबने बांधलेल्या नांगरगाव लोणावळा नगरपरिषदेच्या शाळेतील स्वच्छतागृहाचे हस्तांतरण करण्यात आले. शाळेत बाधलेले स्वच्छतागृह मोडकळीस येऊन वापरण्या योग्य नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांची विशेष करून विद्यार्थिनींची खूप गैरसोय होत असे .पावसाळ्यात त्यात आणखीनच भर पडत असे. शाळेला स्वच्छतागृह असणे अनिवार्य आहे .ही मूलभूत गरज आहे.रोटरी क्लब ऑफ लोणावळ्याच्या निरीक्षणात ही गोष्ट आली व क्लब ने तात्काळ सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अतिशय थोडक्या अवधीत उत्तम असे शौचालय बांधले. याकरिता मुंबईच्या दानशूर व्यक्तीचे अर्थसहाय्य लाभले. ही व्यक्ती प्रसिद्ध परांगमुख असल्यामुळे नावाचा फोटोचा उल्लेख करत नाही. या समारंभास रोटरीच्या अध्यक्षा विजया कल्याण, नवनिर्वाचित नगरपालिका सदस्य, सुभाष जी डेनकर, संवाद शाळेच्या अध्यक्षा सौ. परमेश्वरी दामले श्री सुरेश जी गायकवाड रोटेरियन धीरूभाई टेलर रो. नितीनजी कल्याण रोटेरियन रवींद्र कुलकर्णी जयवंत नलवडे रोटेरियन पुंडलिक वानखेडे रोटेरियन नारायण शारवाले, रोटेरियन दिलीप पवार, शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती येवले उपस्थित होत्या. रोटेरियन रवींद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर स्वाती येवले यांनी सत्कार व आभार प्र दर्शन केले .विशेष म्हणजे श्री डेंनकर यांनी आपल्या भाषणात स्वच्छतागृहाचे मेंटेनन्स करण्याची जबाबदारी घेतली. चहापानानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



