कुसगाव काले,जिल्हा परिषद गटाचे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांची प्रचारामध्ये मोठी आघाडी








मावळ मराठा न्युज -लोणावळा कुसगाव काले या जिल्हा परिषद गटाचे भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली असून सर्व गावांमध्ये त्यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. विकासाचा आश्वासक चेहरा म्हणून भाऊसाहेब गुंड यांच्याकडे या संपूर्ण जिल्हा परिषद गटातील मतदार पाहत आहेत. भाऊसाहेब गुंड यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना केलेली विकास कामे नागरिकांच्या स्मरणात असून प्रचाराच्या निमित्त गावोगावी फिरत असताना त्यांनी या संपूर्ण जिल्हा परिषद गटांमध्ये आगामी काळामध्ये करणार असलेल्या कामांची एक ब्ल्यू प्रिंट तयार केली असून ती नागरिकांना आपलेसी वाटत आहे. केवळ आश्वासन म्हणून नाही तर पुढील पाच वर्षांमध्ये या संपूर्ण भागामध्ये गावोगावी विकासाची गंगा पोहोचवत प्रत्येक गावाचा शाश्वत विकास करण्याचा शब्द दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड हे मतदारांना देत आहेत.कुसगाव ग्रामपंचायत या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या गावामध्ये त्यांनी नुकतीच प्रचार रॅली काढली होती ग्रामदैवतेचे दर्शन घेत आपल्या सहकाऱ्यांना व नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांनी गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले होते. मोठ्या संख्येने ग्रामस्थ त्यांच्या या दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते महिला माता-भगिनींनी भाऊसाहेब गुंड यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या आमचा भाऊ ही आमच्या गावाची शान आहे व भाऊच्या माध्यमातून झालेला विकास आम्हा सर्वांना परिचित आहे केवळ आमच्याच गावाचा नाही तर या संपूर्ण जिल्हा परिषद गटाचा विकास करण्यासाठी भाऊसाहेब गुंड हेच सक्षम नेतृत्व असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. वेगवेगळ्या संघटनाने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे. भाऊसाहेब गुंड हे भाजपाच्या कमळ या चिन्हावरून निवडणूक लढवत असले तरी सर्व पक्षांचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. मागील २७ ते ३० वर्ष समाजकारण व राजकारणामध्ये काम करत असताना त्यांनी जोडलेला मित्रपरिवार व विकासाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची जोडलेली नाळ हीच त्यांना विजयापर्यंत घेऊन जाणार आहे.मागील दोन दिवसापासून काले पंचायत समिती गणांमधील वेगवेगळ्या गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड व पंचायत समितीच्या सदस्या सीमा मुकुंद ठाकर हे दोन्ही उमेदवार फिरत असताना त्यांना नागरिकांचा भरभरून असा पाठिंबा मिळत आहे. पवनानगर या संपूर्ण भागामध्ये मुकुंद ठाकर यांचा मोठा मित्रपरिवार व नातेवाईक परिवार आहे. मितवासी व सर्वांना सोबत घेऊन चालणारे मुकुंद ठाकर व त्यांच्या पत्नी येळसे गावच्या माजी सरपंच सीमा मुकुंद ठाकर यांना या संपूर्ण भागामधून मोठा पाठिंबा मतदारांचा व नागरिकांचा भेटत आहे. भाऊसाहेब गुंड यांनी देखील या भागामध्ये मागील अनेक वर्षांपासून केलेली कामे व सर्वसामान्य नागरिकांना सोबत निर्माण झालेले प्रेमाच्या स्नेहाचे नाते या सर्व बाबींमुळे सर्वसामान्य जनता ही या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे.
काले पंचायत समिती गण हा पूर्वीपासूनच भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे यावेळी देखील या पंचायत समिती गण मधून भाजपाची या दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य देण्याचे आश्वासन या भागातील नागरिकांनी दिले आहे. पवनानगर परिसरातील गावांचा व वाड्यावर त्यांचा विकास करण्यासोबतच येतील तरुणांना महिलांना व युवकांना मोठ्या प्रमाणात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा शब्द भाऊसाहेब गुंड यांनी दिला आहे. पवना धरणाच्या परिसरामध्ये असलेल्या या गावांमध्ये आजही अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे समस्या जाणवत आहे तसेच काही गावांमध्ये स्मशानभूमी यांची समस्या आहे हे सर्व प्रश्न सोडवत नागरिकांना विकासाच्या माध्यमातून दिलेला शब्द पूर्ण करू असे त्यांनी म्हटले आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच भाऊसाहेब गुंड यांनी या संपूर्ण परिसरामध्ये प्रचार यंत्रणा राबवत नागरिकांशी घरोघरी जाऊन संवाद साधला आहे. प्रचारच्या अंतिम टप्प्यामध्ये आला असताना भाऊसाहेब गुंड यांनी प्रचारामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. त्यांच्यासोबत असलेले पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार नवनाथ हारपुडे व सीमा मुकुंद ठाकर या सर्व उमेदवार हे विकासाची दूरदृष्टी असलेले व सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले आश्वासक उमेदवार असल्यामुळे या संपूर्ण जिल्हा परिषद गटामधून या उमेदवारांना प्रथम क्रमांकाची पसंती मतदारांकडून मिळत आहे.



