*लोणावळा महाविद्यालयात ‘संशोधनाकडे वळा’ उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद;ICT मुंबईच्या संशोधिका अंकिता कान्हेरे यांचे मार्गदर्शन*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व श्रीमती एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, वलवण, लोणावळा येथे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘संशोधनाकडे वळा’ या विशेष व्याख्यानाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.मराठी विज्ञान परिषद, लोणावळा विभाग आणि लोणावळा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ५ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून मुंबई येथील नामांकित ICT संस्थेतील पीएचडी संशोधिका श्रीमती अंकिता कान्हेरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.त्या म्हणाल्या, “संशोधन ही केवळ प्रयोगशाळेपुरती मर्यादित गोष्ट नसून ती एक जीवनशैली आहे. भारतातील जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थांमध्ये महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेत संशोधनात उच्च भरारी घ्यावी.”संशोधनाची गुणवत्ता हीच प्रगतीची गुरुकिल्ली – प्राचार्यकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांनी संशोधनाच्या गुणवत्तेवर भर दिला.ते म्हणाले, “केवळ पदव्या मिळवणे पुरेसे नसून संशोधनाची गुणवत्ता (Quality of Research) वाढवणे ही काळाची गरज आहे. महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांतील प्राध्यापक संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन संशोधनात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करावी.”भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांची माहितीमुख्य वक्त्या श्रीमती अंकिता कान्हेरे यांनी भारतातील विविध नामांकित संशोधन संस्थांची माहिती विद्यार्थिनींना करून दिली. संशोधन का करावे, त्याचे उद्दिष्ट काय आणि योग्य पद्धतीने केलेले संशोधन समाजासाठी कसे उपयुक्त ठरते यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विशेषतः सामान्य विज्ञान तसेच कोविड-१९ संशोधनाचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे श्रीकृष्ण वर्तक तसेच उपप्राचार्य डॉ. विलास पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page