गौरव उमटे या चिमुकल्याच्या आरोग्यात सुधारणा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा यांचे कडून व्हील चेअर

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 90;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

मावळ मराठा न्युज – कुसगांव,लोणावळा गुरव वस्ती,लोणावळा येथे राहणाऱ्या एका १३ वर्षीय गौरव चिमुकल्याला एका गंभीर आजाराने त्रासले आहे. ६ महिने जवळपास केईएम रुग्णालयात उपचार करून आई वैशाली उमटे यांनी त्याची काळजी घेतली सोबत घर संसारचाचा गाडा दोन्ही आई वडील कसाबसा ओढत त्याची काळजी घेत आहेत. लोणावळ्यातील आरोग्य दूत अशी ओळख असलेले नंदकिशोर खंडेलवाल यांना कळताच त्यांनी स्वतः धाव घेत गौरव जो जीवनाशी झुंज देतोय त्यासाठी काय काय करता येईल? औषधे,यंत्र सामुग्री देता येईल का त्याचाच एक भाग म्हणून त्याला फिरायला व्हील चेअर भेट देण्यात आली. लायन्स क्लब ऑफ लोणावळा च्या माध्यमातून डॉ ला.पोपट ओसवाल यांनी देखील स्वतः रुग्णाला भेट देऊन त्याच्या आरोग्याची विचारपूस केली. लायन आशिष पॉन,ला.लीना पॉन,ला युवराज शेट्टी,ला.स्वतंत्र कुमार अगरवाल,विकी पालरेशा पंकज आर जोशी, तळेगाव,राजू मगनलाल,विनय जी तोमर,डॉ गिरावले सर्जेराव,बी एच रजपूत, उषा पंडित,लायन रोहित थोरात, लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा चे अध्यक्षा कांता ओसवाल,डॉ पी एम ओसवाल अनिल भिल्लारेयांनी सर्वांनी त्या चिमुकल्याला मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे गौरव उमटे या चिमुकल्याच्या तब्बेतीत काहींसी सुधारणा होताना दिसत आहे. रुग्णाची आई वैशाली उमटे यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत.या चिमुकल्याला अजून मदतीची गरज असल्याने इच्छुक दानशूर मान्यवर यांनी खाली दिलेल्या रुग्णाच्या आईशी थेट संपर्क साधून मदत करावी अशी मावळ मराठा न्यूज च्या माध्यमातून करण्यात येत आहे.*मदतीसाठी संपर्क सौ.वैशाली उमटे – ७३५०६०९१०७

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page