मावळात राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर,सुनील शेळके प्रचड़ मताधिक्याने विजयी



मावळ मराठा न्युज – मावळ विधानसभा निवडणुकीत पहिल्या दिवसापासून रंगत वाढली होती.दोन्ही उमदेवार यांच्या प्रचाराला लाखोची गर्दी उपस्थित होती. त्या दिवसापासून मतदारात उत्सुकता वाढली होती घासून ठासून आणि काटेची टक्कर होइल असेच सर्वाना वाटत होते परंतु सुनील शेळके यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी ठेवत शेवट पर्यंत टिकली.मावळ,महिला भगिनींच्या पाठिंब्याने २०२४ च्या निवडणुकीत आमदार सुनिल शेळके यांनी १०८५६५ एवढ्या विक्रमी मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.बाळा भेगडे पूर्ण ताकत लावून देखील विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आपल्या कामाचा जोरावर दणदणीत विजय मिळवला.महायुतीकडून मावळची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आली होती. त्यामुळे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांना उमेदवारी देण्यात आली. परंतू त्यांच्याच पक्षातून बंडखोरी करत बापूसाहेब भेगडे यांनी त्यांना कडवे आव्हान दिले होते. महायुतीतील भाजपाच्या तालुक्यातील वरीष्ठ नेत्यांनी भेगडे यांना पाठिंबा दर्शवत मावळ पॅटर्न तयार केला होता पण मावळातील जनतेने मावळ पॅटर्न नाकारत महिला पटर्न चालविला आहे.त्यामुळे नेत्यांनी जनतेला गृहीत धरू नये असा संदेश मावळातून राज्यभर गेला आहे.नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग तळेगाव दाभाडे या ठिकाणी आज सकाळी साडेआठ वाजता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर बॅलेट मशीन मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. २९ फेऱ्या मतमोजणीच्या झाल्या. याकरता १४ टेबल लावण्यात आले होते. अगदी पोस्टल मतमोजणी पासून तर शेवटच्या २९ व्या फेरीपर्यंत आमदार सुनील शेळके यांनी प्रत्येक फेरी मधली आघाडी कायम ठेवली.३२९१ मताने सुरू झालेली त्यांची आघाडी ही २९ व्या फेरी अखेर १ लाख ८ हजार ५६५ मतांवर गेली होती.महाविकास आघाडी भारतीय जनता पक्षातील वरीष्ठ नेते, मनसे यांसह अनेकांनी पाठिंबा देऊनही सुनिल शेळके यांनी २०१९ पेक्षाही मोठ्या फरकाने विजयश्री मिळवून मोठे यश संपादन केले आहे.




