डाॅ. प्रतिमा इंगोले यांच्या “तारुण्याची बखर” नाटकाला डाॅ. शिवाजीराव चव्हाण ग्रंंथालयाचा राज्य पुरस्कार

मावळ मराठा न्युज :-सातारा-(पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर) विदर्भ कन्या चतुरस्त्र प्रतिभावंत साहित्यिका, डाॅ प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या “तारुण्याची बखर ” या नाटकाला सातारा येथील डाॅ शिवाजीराव ग्रंथालयाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे.सदर वाचनालयाचा पुरस्कार सन्मानाचा असून रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.प्रतिमा ताईंना मिळालेला हा एकशे एकविसावा पुरस्कार आहे.यापूर्वी या नाटकाला नागपूर येथील आंबेडकराईट मुव्हमेंटचा अश्र्वघोष पुरस्कार मिळाला आहे. “तारुण्याची बखर” नाटक राजकारणावर असून त्यात आजच्या राजकारणी मंडळींनी दिशाभूल केलेल्या तरुणाईचे चित्रण आहे.पण समाजाला राजकारणाची चटक लागली आहे.त्यापायी ग्रामीण भागातून तारुण्य बरबाद होते आहे.पण कोणी भानावर येत नाही. त्यात पुन्हा दारूची चटक आहेच.हे नाटक समाज प्रबोधनाबरोबर मार्गदर्शन करणारे आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाला तर ते अधिक लोकांपर्यंत पोहोचणार आहे, असे प्रतिमा ताईंनी प्रस्तुत प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. सर्व मान्यवर दिग्गज साहित्यिकांनी त्यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page