स्वानंद संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त परिसंवाद संपन्न

मावळ मराठा न्यूज -तारांगण,सायन्स पार्क, चिंचवड – (९ फेब्रुवारी) स्वानंद महिला संस्था, पिंपरी–चिंचवड यांच्या वतीने आयोजित “पुरुषांनाही मेनोपॉज असतो का…?” या विषयावरील परिसंवादात डॉ. वैशाली लोढा बोलत होत्या. संस्थेच्या रौप्य महोत्सव वर्षा निमित्त हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला.डॉ. लोढा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, टेस्टेस्टेरॉन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये शारीरिक, मानसिक व लैंगिक बदल दिसून येतात. वाढते वय, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, धूम्रपान, मद्यसेवन, झोपेची अनियमितता व व्यायामाचा अभाव ही कारणे टेस्टेस्टेरॉनची पातळी कमी होण्यास कारणीभूत ठरतात. योग्य वेळी निदान व उपचार केल्यास आनंदी व समतोल जीवन शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संवाद, संतुलित आहार व नियमित व्यायाम यांचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. पत्नीची समजूतदार साथ पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत मोलाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.या परिसंवादाच्या अध्यक्षपदी डॉ. वैशाली लोढा होत्या.सायन्स पार्कच्या अधिकारी अस्मिता ताई सावंत आणि ज्येष्ठ बास्केटबॉलपटू अश्विनी वर्टी मंचावर उपस्थित होते सहभागींमध्ये राजश्री बिनायकिया, लीना कटारिया, शकुंतला ओस्तवाल, जयश्री बाफना आणि लता बाविस्कर यांचा समावेश होता. परिसंवादाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. सीमा गांधी (ज्येष्ठ साहित्यिका) यांनी केले. सर्व महिलांना सायन्स पार्कची सहल देखील घडवण्यात आली आणि त्याचा आनंद सर्वांनी लुटला.कार्यक्रमाचे आयोजन शोभा बंब (अध्यक्ष), प्रा. सुरेखा कटारिया (संस्थापिका), सीमा गांधी (सचिव) आणि कांचनमाला बाफना (माजी अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page