गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखले जावे यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पिंपरी चिंचवड कॉलेजचे स्वछता मोहीम

मावळ मराठा न्यूज़ पिंपरी , महाराष्ट्र शासनाने आवाहन केल्यानुसार आज २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्ताने विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आल्या होत्या. गड-किल्ल्यांचे पावित्र्य राखले जावे या हेतूने कौशल्य विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी गडकिल्ले स्वच्छता मोहीम आखली. या मोहिमेत सहभागी होत आज आय.टी.आय.पिंपरी चिंचवड ने किल्ले सिंहगडावर देखील ही स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड कॉलेजचे सुमारे ८० विद्यार्थी, प्राचार्य श्री शशिकांत साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, गटनिदेशक श्री मोरे सर, श्री पावडे सर व सर्व स्टाफ या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.सौ. निर्मल तावरे मॅडम – सांख्यिकी सह्ययक यांची विशेष उपस्थिती होती.या माहिमेसाठी पुण्यातील राजे शिवराय प्रतिष्ठानचे अक्षय मुळे ,हर्षद खरात यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. सकाळी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पूजनाने ही मोहीम सुरु करण्यात आली. प्राचार्य श्री. शशिकांत साबळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छता करताना घ्यावयाची काळजी, तसेच कचऱ्याचे संकलन यासंदर्भात अक्षय मुळे यांनी योग्य त्या सूचना दिल्या. किल्ल्याचा इतिहास, या जागेचे पावित्र्य इत्यादी माहिती दिल्यानंतर, कॉलेजच्या शिक्षकांना राजे शिवराय प्रतिष्ठानचे माहितीपत्रक देण्यात आले.नंतर गटागटाने स्वच्छता करून सर्व कचरा कचरापेटीपर्यंत आणण्यात आला.अशा प्रकारे अत्यंत उत्साही वातावरणात आजची स्वच्छता मोहीम पार पडली.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page