लोकशाही न्युज चा आवाज बंद करून केंद्रसरकार ची वाटचाल आत्महत्या कडे

मावळ मराठा न्यूज :- लोणावळा,केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर नियमित आवाज उठवणारे लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचा परवाना पुढील ३० दिवस निलंबित करण्यात आला आहे. ३० दिवस चॅनेलचे प्रसारण बंद करण्याचे आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने दिले आहेत. पत्रकारांना लोकशाही चा चवथा खांब म्हणणारे केंद्र सरकार हळू हळू हुकूमशाही कडे वाटचाल करताना दिसत आहे. आणीबाणी च्या काळात स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी देखील असा प्रयत्न केला होता त्यावेळी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली होती.केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने लोकशाही मराठी वृत्तवाहिनी ९ जानेवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून बंद करण्याचा आदेश दिला आहे. लोकशाही मराठी वाहिनीच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणावर स्पष्ट मत मांडले जात होते. लोकांपर्यंत सत्य जावे असा या वाहिनीचा प्रयत्न होता. अभिव्यक्तीचा घटनात्मक अधिकार हुकूमशाही पद्धतीने केंद्र सरकारने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकारच्या या हुकूमशाहीचा आम्ही तीव्र शब्दात राज्यभर निषेध व्यक्त होत आहे . लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार व त्यांचे सर्व पत्रकार यांच्या समवेत आम्ही लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी व लोकशाहीचे सक्षमीकरण व्हावे यासाठी खांद्याला खांदा लावून रस्त्यावरचा लढा आम्ही लढू, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटले आहे.यापूर्वीही भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील बातम्या दाखविल्यानंतर तीन दिवस वाहिनी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने स्थगिती उठविली होती. परंतु आता पुन्हा या चॅनल ला ३० दिवस बंद करण्याचे आदेश दिले आहेत.लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे संपादक कमलेश सुतार यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, लोकशाही मराठीचा परवाना पुढील ३० दिवस निलंबित ! ३० दिवस चॅनेलचे प्रसारण बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page