*AI च्या साहाय्याने वनौषधी संशोधनात लोणावळा महाविद्यालयाची आंतरराष्ट्रीय भरारी*

मावळ मराठा न्युज -लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे आर्ट्स, श्रीमती एस. जी. गुप्ता कॉमर्स आणि श्रीमती शारदाबेन अमृतलाल मिठाईवाला सायन्स कॉलेज, वळवण, लोणावळा येथील दोन प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.रसायनशास्त्र विभागप्रमुख व सहयोगी प्राध्यापक *डॉ. संदीप गोविंदराव सोनटक्के* तसेच वनस्पतिशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक *डॉ. पवन शिनगारे* यांचा *“Artificial Intelligence and Machine Learning in Phytomedicine Innovation”* हा संशोधन लेख _*अमेरिकेतील नामांकित शैक्षणिक प्रकाशन संस्था IGI Global (Hershey, Pennsylvania, USA)*_ प्रकाशित करत असलेल्या “Herbal Medicine Approaches to Antimicrobial Resistance and One Health” या आंतरराष्ट्रीय पुस्तकात प्रकाशनासाठी अधिकृतरीत्या मंजूर करण्यात आला आहे.या संशोधनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व मशीन लर्निंगचा वापर करून वनौषधी संशोधनात नवकल्पना कशा घडवता येतात, तसेच वाढत्या अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (Antimicrobial Resistance) समस्येवर प्रभावी उपाय शोधण्याच्या दृष्टीने सखोल विश्लेषण करण्यात आले आहे. ‘One Health’ या संकल्पनेअंतर्गत मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या एकात्मिक आरोग्य दृष्टिकोनावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.*या उल्लेखनीय यशाबद्दल लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सन्मानीय सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. नरेंद्र देशमुख यांनी दोन्ही प्राध्यापकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले*. त्यांनी सांगितले की, “महाविद्यालयातील प्राध्यापकांनी केलेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता व संशोधन परंपरेचे प्रतीक आहे. महाविद्यालय व्यवस्थापन नेहमीच संशोधन, नवकल्पना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागासाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, प्रोत्साहन व सहकार्य देत राहील.”IGI Global ही आंतरराष्ट्रीय दर्जाची शैक्षणिक प्रकाशन संस्था असून तिच्या प्रकाशनांमध्ये कठोर समिक्षा (Peer Review) प्रक्रिया राबविली जाते. तिची पुस्तके व संशोधन जगभरातील विद्यापीठे, संशोधन संस्था आणि शैक्षणिक ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत.महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांनी देखील दोन्ही प्राध्यापकांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page