ज्येष्ठत्व एक दागिना- अण्णा जोगदंड; सोमेश्वर ज्येष्ठ नागरिक संघात संगीत गायनाने सभासदांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

मावळ मराठा न्युज – पुणे,जून महिना महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने महिन्यातील १२४ पुरुष व महिला सभासदांचे वाढदिवस झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष श्री सुदाम दिवटे होते तर प्रमुख पाहुणे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष  आण्णा जोगदंड, पिंपरी चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा श्रीमती वृषालीताई मरळ, मा.नगरसेवक श्री बाळासाहेब ओव्हाळ होते.
दीप प्रज्वलनानंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांचा बहारदार एक तासाचा संगीत गायनाचा कार्यक्रम झाला.यावेळी प्रमुख पाहुणे अण्णा जोगदंड म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे दोन पिढ्या घडविण्याचे काम करत असतात आपल्या मुलाबरोबर नातवंडानाही आपल्या नातेसंबंधाची व आपल्या रूढी परंपराचे चांगले संस्कार त्यांच्यावर बिंबवत असतात आपल्या अनुभवाची शिदोरी ही कुटुंबासह समाजाला देत असल्याचे गौरवोद्गार जोगदंड यांनी काढले.
माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ म्हणाले की सर्व ज्येष्ठांनी वय विसरून तरुणासारखे स्वतःसाठी जगा,आवडेल ते काम करा,मन प्रसन्न ठेवा असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष वृषालीताई मरळ म्हणाल्या  की मी नुकतेच महासंघासाठी तीन कोटी रुपयांची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडे केली आहे आपली पाच मजली इमारत चिंचवड येथे लवकरच पूर्ण होणार आहे.
संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे म्हणाले की वर्षभर आम्ही वेगवेगळे सभासदांसाठी उपक्रम राबवत असतो आणि 400 जेष्ठांसाठी बसमध्ये सवलतीचे कार्ड आम्ही संघाच्या माध्यमातून त्यांना दिले आहे.
तसेच वाढदिवस असणार्या सभासदांचा सौ शेलार राजश्री व सौ सुरेखाताई सावंत, सौ भारती कोळेकर  संघाच्या प्रवेशद्वाराजवळच औक्षण केले व संघाच्या वतीने सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. वाढदिवस असणार्या सभासदांनी केक कापून आनंद साजरा केला.
संघाचे उपाध्यक्ष श्री साहेबराव देसले यांनी प्रास्ताविक
संघाचे सचिव श्री सुरेश बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजन,प्रयोजन, नियोजन मंडळाचे खजिनदार श्री प्रकाश सावंत, श्री तुकाराम कोरडे, श्री किशोर गायकवाड, श्री धोंडीराम पाटील, श्री राजेन्द्र मोरे, श्री शिवकांत जैस्वाल, श्री रोहिदास पिलाने, श्री धनाजी शिंदे यांनी सहकार्य केले.
महासंघाचे अध्यक्ष वृषालीताई मरळ, सोमेश्वर जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुदाम दिवटे, मानवी हक्क संरक्षण जागृतीचे अध्यक्ष अण्णा जोगदंड,मा. नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page