रोटरी क्लब ऑफ़ लोणावला आणि डॉ.बी एन पुरंदरे महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न

मावळ मराठा न्यूज़ लोनावला :- रोटरी क्लब ऑफ़ लोणावला डॉ.बी एन पुरंदरे कला ,एस एस जीजी वाणिज्य एस एस ए एम् विज्ञान महाविद्यालय आणि कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वलवन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोनावला एजुकेशन ट्रस्ट चे सचिव दत्ता त्रय पालेकर,रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पवार यांचे हस्ते यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मुस्तफ़ा कांट्रेक्टर ,प्रभारी प्राचार्य डॉ.विलास पाटिल , एड.अजय भोईर ,विजया कल्याणजी ,श्रीकृष्ण वर्तक ,नितिन कल्याणजी ,रविंद्र कुलकर्णी ,संस्थेचे विश्वस्त नंदकुमार वालुंज,विशाल पाडाले ,धीरूभाई कल्याणजी ,उदय पाटिल उपस्थित होते .एड मोनाली कुलकर्णी शेलार, जयवंत नलोडे ,कौस्तुभ दामले ,दूरिया रामपुरवाला आदिनी शिबिराला भेट दिली .प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यानी विशेष परिश्रम घेतले .लोणावळ्यातील सामाजिक कार्यकर्ते निखिल सोमन यांनी १०८ वेळा रक्तदान केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी ९० हुन अधिक रक्तदात्यानी रक्तदान केले

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page