लोणावळा महाविद्यालयात पहिला “राज्य क्रीडा दिन” उत्साहात संपन्न

मावळ मराठा न्युज :- लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचालित डॉ. बी एन. पुरंदरे कला. एस. एस. जी. जी कॉमर्स एस. एस. ए. एम विज्ञान महाविद्यालय, कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महविद्यालय व लोणावळा महाविद्यालय माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने पहिला राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न झाला.शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या शासन निर्णयानुसार ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिन राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करत असताना खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तर मान्यवर व माजी विद्यार्थी खेळाडू यांचे हस्ते क्रीडाज्योत प्रज्वल करण्यात आले व खाशाबा जाधव यांचा जीवनपट सादर करण्यात आला.यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट चे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय पाळेकर यांनी संस्थेची वाटचाल व भविष्यात संस्थेद्वारे खेळासाठी भरीव कामगिरी करणार असल्याचे मनोगतात सांगितले.तर माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष श्री. विशाल विकारी यांनी सत्कारार्थी खेळाडू कडून प्रेरणा घेऊन खेळात भरीव कामगिरी करावी असे आव्हान केलेसि.डि.सी सदस्य श्री विशाल पाडाळे यांनी सत्कारार्थी माजी विद्यार्थी खेळाडूंनी महाविद्यालयात वेळोवेळी येऊन महाविद्यालय विकासासाठी व जिमखाना विभागातील खेळाडूंसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तर राष्ट्रिय पंच व कुस्तिगीर श्री.बंडू येवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व माजी व आजी विद्यार्थी खेळाडूना शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमात राष्ट्रिय व आंतरराष्ट्रिय पातळीवर खेळामध्ये विशेष नैपुण्यप्राप्त ११ खेळाडूंचा सन्मान पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व मावळ तालुक्यातील ऑलिंपिक खेळाडूच्या जीवनावरील पुस्तक भेट देऊन करण्यात आले.यामध्ये श्री. नरेंद्र पाळेकर (योगासन / वेटलिफ्टिंग) श्री. लक्ष्मण पडवळ (योगासन), तिलोतमा अत्तरदे -दिवेकर (योगासन), नितेश कुटे (वेटलिफ्टिंग), शिल्पा कोपरकर (क्रिकेट), श्री अशोक मते (पॉवरलिफ्टिंग), श्री. विलास जाधव (पॉवरलिफ्टिंग), विद्या पाडाळे (कुस्ती व पॉवरलिफ्टिंग), रूपाली ढाकोळ (कुस्ती व पॉवरलिफ्टिंग), आकाश बोंद्रे (पॉवरलिफ्टिंग), समृद्धी भोसले (कुस्ती) आदिसह कु. मेघा नवनाथ तावरे शालेय राष्ट्रिय (नॅशनल) वेटलिफ्टर हीचा यावेळी सन्मान करण्यात आला.सदर खेळाडूंना माजी विद्यार्थी श्री विनोद होगले यांच्या वतीने सन्मानचिन्हे तर प्रा. संजय साळुंके प्रा. दीपक तारे यांच्या वतीने खेळाडूंच्या जीवनावरील पुस्तक भेट देण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभाग प्रभारी श्री. दीपक तारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. भूषण गोंदके यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संजय साळुंके यांनी केलेया वेळी सदर कार्यक्रम संपन्न करण्यासाठी परीक्षा विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र देवरे यांच्या सह जिमखाना विभागाचे श्री. तेजस भांगारे, वरद घारे, दुर्गा ससाणे, आरती केदार, राकेश साळुंके, रवी उंबरे, मयूर गायकवाड, मोहन पवार, आकाश गायकवाड, अनिकेत ढाकोळ, गणेश घोजगे, साहिल पवार, पूजा चोरगे, मीनाक्षी बोत्रे आदी जिमखाना विभागाच्या विद्यार्थानी विशेष सहकार्य केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page