*लायन्स क्लब लोणावळा खंडाळा तर्फे स्वातंत्र्यदिन ब्लाइंड होम येथे साजरा*








मावळ मराठा न्युज – लोणावळा,लायन्स क्लब लोणावळा खंडाळा यांच्या वतीने गतवर्षाप्रमाणे या वर्षी देखील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा द नॅब – लायन्स होम फॉर एजिंग ब्लाइंड (ब्लाइंड होम), खंडाळा, लोणावळा येथे पार पडला.या वेळी ध्वजारोहणाचा मान झोन चेअरमन लायन देवल पारेख व ऍक्टिव्हिटी चेअरमेन लायन दीप्ती लुनावत यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी ब्लाइंड होम मधील दृष्टीहीन व्यक्तींनी ढोलक, हार्मोनियमच्या साथीने देशभक्तीपर गीतांचे सुंदर सादरीकरण करून आपली अप्रतिम कला सादर केली.यावेळी लायन्स सदस्यांनी ब्लाइंड होममधील दृष्टीहीन व्यक्तींनी तयार केलेले हस्तनिर्मित टॉवेल, नॅपकिन, मेणबत्त्या इत्यादी वस्तूंची पाहणी केली या कार्यक्रमात लायन दीप्ती लुनावत यांनी उपस्थितांना मागदर्शनपर संबोधन करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्या दिल्या. लायन्स क्लब लोणावळा खंडाळा तर्फे स्वातंत्र्यदिना निमित्त अल्पोपहारची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य लायन अभय जैन, अमित लुनावत, मनोज लुंकड, डॉ. दिलीप सुराणा, देवेंद्र नालेकर, अँड. प्रफुल्ल लुंकड, जयश्री सुराणा, दिपाली गाला, अश्विनी कदम (खजिनदार) व निराली नालेकर सेक्रेटरी उपस्थित होते.खऱ्या स्वातंत्र्याच्या भावनेने – आपल्या दृष्टीहीन मित्रांसोबत स्वातंत्र्यदिन साजरा करत, नजरेपलीकडचा आनंद वाटत होता अशी भावना उपस्तीतांमध्ये होती.



