लोणावळा महाविद्यालयात कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा








मावळ मराठा न्युज -दिनांक :-२७ फेब्रुवारी२०२६,लोणावळा,लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट संचलित,डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती. एस.जी. गुप्ता वाणिज्य, व श्रीमती. एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय, वलवण. लोणावळा.येथे मराठी विभाग व भाषा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी वि.वा.शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनी साजरा करण्यात येणारा ‘मराठी भाषा गौरव दिन’ विविध स्पर्धा घेऊन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. नरेंद्र देशमुख होते तर विचारमंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास पाटील , डॉ.अमर काटकर प्रा.धनराज पाटील व प्रा. वर्गीस उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य, डॉ. नरेंद्र देशमुख यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन, महाविद्यालयात घेण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांचे व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आपल्या महाविद्यालयात भविष्यात मोठे ,कलाकार, कवी ,साहित्यिक उदयास येतील असे सूतोवाच करत , विद्यार्थ्यांनी मावळ तालुक्यातील लोकगीताचे केलेले संकलन हे स्तुत्य असल्याचे सांगत भित्तीपत्रकामधील एका लोकगीताचे स्वतः वाचन केले.कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात मान्यवरांच्या हस्ते कविवर्य वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले .यावेळी प्रास्ताविक भाषा मंडळाच्या प्रमुख डॉ. भारती राजेभोसले यांनी केले. त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे स्वरूप सांगत वेगवेगळ्या स्पर्धांच्या आयोजनाबाबत सविस्तर माहिती सांगितली, त्याच बरोबर महाविद्यालयातील डॉ. मित्रा मॅडम यांनी महाविद्यालयातील उपक्रमाबद्दल व विद्यार्थ्यांमधील कलेची माहिती सांगत विद्यार्थ्यांकडुन प्रहसन (स्किट ) कसे करून घेतले याबाबत माहिती सांगितली.मराठी विभागाचे प्रा.ज्ञानदेव रणशूर यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मराठी ही आपली मातृभाषा आहे , मातृभाषा ही हृदयातून बोलली जाते ती केवळ भाषा नसते तर ती एक स्वतंत्र विचार असते , भावना असते, संस्कार व संस्कृती असते असे सांगून मराठी भाषेचे महत्व आणि तिचा गौरव करणं हे आपल्या सर्वांच कर्तव्य असल्याचे सांगितले . मराठी विभागाच्या वतीने मावळ तालुक्यातील लोकगीतांचे संकलन या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांनी जात्यावरील ओव्या, वासुदेवाची गाणी, पोतराजाची गाणी, शेतीतील भलर गीत, लावणी गीत, इत्यादी प्रकारच्या गाण्यांचे ध्वनीमुद्रण केले व त्याचे भित्तीपत्रक पोस्टर्स तयार करण्यात आले. अशा प्रकारे आपला जुना ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला या भित्तीपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नरेंद्र देशमुख यांच्या हस्ते झाले तसेच मराठी विभागाच्या वतीने मराठी स्वाक्षरी,काव्यवाचन, वक्तृत्व या उपक्रमाचे हे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.काव्यवाचन,प्रहसन,अशा विविध उपक्रमाला महाविद्यालययाचे मराठी विभागप्रमुख डॉ.राजेंद्र देवरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.संदीप पोकळे, डॉ.संजय लांडगे, प्रा. सोमनाथ आपटे, डॉ.संदीप सोनटक्के , डॉ . संदीप लबडे, प्रा.संजय साळुंखे डॉ. धनश्री पाध्ये, प्रा, भक्ती आहेर मॅडम,प्रा.समीर गायकवाड ,प्रा.सोनंम यादव , प्रा, योगिता मोरे , प्रा.प्रियांका पाटील , प्रा. पल्लवी तिखे, प्रा.गणेश आखाडे, प्रा. अमोल नवगिरे, प्रा.मनीषा सोनवणे, भूगोल विभाग प्रा. भूषण गोंदके, प्रा. कुलकर्णी, प्रा.राणे इत्यादी मान्यवर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. धनराज पाटील यांनी मानले .



