आपली सुरक्षितता ,आपली जबाबदारी,आणि आपले आरोग्य आपली जबाबदारी डाँ.प्रमोद कुबडे

मावळ मराठा न्युज :-पिंपरी,पिंपरी येथे सावित्रीबाई फुले सभागृहात गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ कुबडे म्हणाले की, आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य तंदुरुस्त असणे गरजेचे आहे ,आरोग्य अशी गोष्ट आहे की पैशाने विकत घेता येत नाही .निरोगी आरोग्यासाठी व्यायाम, संतुलित आहार,ताणतणाव मुक्त जीवन जगा.आणि आपल्या कामाबरोबरच आपली आवड जपण्याचा सल्ला त्यांनी दिला .वाहतूक विभागाचे उपायुक्त बापूसाहेब बांगर म्हणाले की आपल्या शहरात गेल्या दोन वर्षात ३७३ रस्ते अपघातात नागरिक मृत्यू झाले ७० खून दोन वर्षातील २० ते ४० वयोगटातील नागरिकांचे झाले आहेत. जास्तीत जास्त दुचाकी आणि पाई चालणाऱ्या नागरिकांचे मृत्यू झाले आहेत. “आपण सुरक्षित तर आपले कुटुंब “सुरक्षित रहा, व्यसनमुक्त जीवन जगा, जग सुंदर आहे, वाहतुकीचे नियम पाळा आर्थिक फसवणुकीच्या आमिषांना बळी पडू नका असे त्यांनी यावेळी सांगितले.बी.एल.जोशी लायन्स इंटरनॅशनलचे म्हणाले की, विम्या यासंबंधीची माहिती कोणी गांभीर्याने घेत नाही. देशात फक्त ५ %ते ६ % लोकांचा विमा आहे. वार्षिक उत्पन्नाच्या २५ % रकमेच्या तरी विमा घेतला पाहिजे. प्रत्येकाचा जीवन विमा ,अपघात विमा असणे गरजेचे आहे .पंतप्रधान जीवन विमा ४३६ रुपये भरून वर्षाला दोन लाखाचा विमा संरक्षण घेता येते तर पंतप्रधान सुरक्षा विमा योजना २० रुपये भरून दोन लाखाचे संरक्षण घेता येते साध्या एटीएम रुपी पे मध्ये दोन लाखाचा विमा असतो तर घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला तर ४० ते ५० लाखाचा विमा असतो.त्यांनी अनेक शासकीय विमा योजनांची माहिती दिली.राजेंद्र  साळुंके निवृत्त सहाय्यक आयुक्त म्हणाले की कामगारांनी काम करताना एसओपी पाळली पाहिजे फाजील आत्मविश्वास जीविताला घातक ठरू शकतो कोणत्या प्रकारचे काम समजल्याशिवाय करू नये असे त्यांनी सांगितले.कामगार मंडळाच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या की ,महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची मनपाला दिलेली जवळपास १०० कोटीची जागा मोरवाडीत आम्ही आमच्या कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून पालिकेकडून परत देण्यास पालिकेला भाग पाडले.यासाठी कामगार मंत्री सुरेश खाडे, कल्याण आयुक्त रविराज इळवे, पालिका आयुक्त सर्वांबरोबर मीटिंग घेऊन सर्वांनुमते  ती जागा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ देण्याचे ठरले या सर्वांच्या सहकार्याने मुळेच झाले असे भारती चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी खंत व्यक्त केली की भारतात वाहतुकीचे नियम मोडणे हे स्टेटस समजले जाते. हेल्मेट न  घालणे, सिग्नल न पाळणे, हे दुर्दैवी आहे . विम्याचे महत्त्व आम्ही महाराष्ट्रभर संस्थेच्या माध्यमातून  नागरिकांना पटवून देणार आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले. केनियांच्या शाळेमध्ये इयत्ता पहिलीपासूनच कायद्याचे ज्ञान अभ्यासात घेतले आहे असे भारतात कधी होणार ? असे डॉ भारती चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला.वृक्षमित्र व मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले कि कामगार कल्याण मंडळ व मराठवाडा जनविकास संघ दोन्ही संस्था मिळून यापुढे रक्तदान शिबिरे ग्रामीण भागात घेणार असल्याचे त्यांनी सांगितलेशहराध्यक्ष मोहम्मदशरीफ मुलांणी यांनी प्रास्ताविक करून मंडळांने आता पण राबवलेले योजना व सामाजिक कार्याची माहिती दिली.तर सचिव राजेश हजारे यांनी महाराष्ट्र कामगार मंडळांने बंद केलेले साहित्य संमेलन परत पत्रव्यवहार करून चालू केल्याचे सांगितले.यावेळी काम कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई चव्हाण ,सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र साळुंके, उपायुक्त वाहतूक विभाग बापूसाहेब बांगर, प्रांतकाल लायसन इंटरनॅशनलचे बी. एल .जोशी ,डॉ प्रमोद कुबडे एमडी स्टार हॉस्पिटल, वृक्षमित्र अरुण पवार ,अँड अनिरुद्ध सानप,कोअर कमिटी सदस्य भरत शिंदे, राजेश हजारे,आण्णा जोगदंड, तानाजी एकोंडे, संजय गोळे, संपत खैरे इत्यादी उपस्थित होते.शहराध्यक्ष महंतांनीमद शरीफ मुलांणी, अशोक सरतापे, ज्ञानेश्वर मलशेट्टी ,शंकर नाणेकर ,शिवाजी पाटील यांनी आयोजन केले तर गुणवंत कामगार काळूराम लांडगे, संगीता जोगदंड, सतीश देशमुख ,सदाशिव एकसंबे, बाळासाहेब साळुंके रघुनाथ फेगडे ,अरुणा शिलाम ,रेणुका हजारे, नितीन यादव ,महेंद्र गायकवाड ,भारती कवटे, पंकज पाटील ज्येष्ठ कवी सुरेश कंक ,प्रबोधनकार शारदाताई मुंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन भरत भारी यांनी केले तर आभार शिवाजी पाटील यांनी मानले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page