आधार फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांत व शिवदुर्ग मित्रचे सुनीलभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त तिळगुळ,चिक्की शालेय साहित्य वाटप

मावळ मराठा न्युज – लोणावळा,आधार फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांत व शिवदुर्ग मित्रचे सचिव सुनीलभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना तिळगुळ चिक्की,केळी व शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरगाव, केवरे,डोंगरगाव वाडी व ओळकाई वाडी ह्या शाळेत करण्यात आला.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे चैतन्य नागरिक पतसंस्थेचे संस्थापक श्री मारुतीदादा साठे , संचालक श्री कांताराम दळवी , डोंगरगावचे सरपंच श्री सुनील येवले , ग्रा.पं.सदस्य श्री देवाभाऊ दळवी , डोंगरगाव भाजपाचे अध्यक्ष मदन नानेकर,कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पाठारे , श्री पांडुरंग तिखे ,श्री गणेश जाधवसाहेब ,श्री भगवतीप्रसाद आगरवाल , श्री बबन दादा फाटक , श्री दत्ताभाऊ वाळंज , श्री भगवान घनवट , श्री प्रमोद बंसल,श्री दत्तात्रय लाड , श्री राजुभाई शेख , श्री पांडुरंग बोराडे , श्री उत्तम ठाकर , सौ मनिषाताई भांगरे , श्रीमती प्रभाताई आकोलकर ,श्रीमती सुमन ढाकोळ व श्री हनुमंत सहादु साबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page