स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा- डॉ.गणेश राख

मावळ मराठा न्यूज :- मोशी (प्रतिनिधी) भारताच्या २०१७-१८च्या आर्थिक अहवालानुसार ६ कोटी ३० लाख स्त्री भ्रूणहत्या झाल्या. यानंतरच्या १० वर्षांच्या काळात किती झाल्या असेल याचा अंदाज नाही. वर्षाला सुमारे अंदाजे ३० ते ४० लाख भ्रूणहत्या झाल्या असाव्यात. स्त्री भ्रूणहत्या हे एक मोठे हत्याकांडच आहे. हे हत्याकांड रोखण्यासाठी डॉक्टरांनी पुढाकार घेतल्यास समाजात परिवर्तन घडून येईल. असे मत बेटी बचाओ जन आंदोलन अभियानाचे प्रणेते डॉ.गणेश राख यांनी व्यक्त केले. बेटी बचाओ जनआंदोलन अभियानच्या वतीने आणि डॉ प्रगती सरडे- चौगुले यांच्या पुढाकाराने मोशी येथे आयोजित केलेल्या बेटी बचाओ जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेविका अश्विनी संतोष जाधव, सारिका बोऱ्हाडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिलाध्यक्ष कविता आल्हाट, शिवसेना शहर संघटीका रूपाली आल्हाट, बेटी बचाओ जनआंदोलन अभियानचे कार्यकर्ते डॉ प्रमोद लोहार, भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा सोनम जांभूळकर, जागृती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा राजश्री शिवले,हर्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ चेतन सरडे,वाय के चौगुले, अनुराधा चौगुले,सदाबहार फाउंडेशनच्या विद्या कुंभार,आयोजक हर्ष हॉस्पिटलच्या संचालिका डॉ प्रगती चौगुले- सरडे आदी उपस्थित होते.यावेळी हर्ष रुग्णालयामध्ये १४० महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.हर्ष रुग्णालयात मुलीचे स्वागत म्हणून नॉर्मन डिलिव्हरी वर ४०% तर सीजेरियन च्या खर्चामध्ये २०% सूट दिली जाईल तसेच मुलींच्या जन्माचे जंगी स्वागत केले जाईल.अशी घोषणा डॉ प्रगती सरडे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळाराम पाटील यांनी तर आभार डॉ प्रगती सरडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हर्ष हॉस्पिटलचे संचालक डॉ चेतन सरडे,डॉ प्रगती चौगुले,डॉ आशिष चौधरी,डॉ स्वाती आंबेकर,डॉ श्रध्दा येळवंडे, डॉ काजल साबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page