स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.रविंद्र इंगळे यांचा दुबईत जीवन गौरव पुरस्काराने गौरव

मावळ मराठा न्यूज:-पिंपरी(प्रतिनिधी) स्वयंदिप सोशल फौंडेशन आणि एस के ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे आयोजित कार्यक्रमात प्रसूतिशास्त्रतज्ञ डॉ रवींद्र इंगळे यांना जीवनगौरव पुरस्कार देवून गौरवण्यात आले. डॉ. रविंद्र प्रल्हाद इंगळे हे स्त्रीरोगतज्ज्ञ व प्रसुतीशास्त्रज्ञ आहे. त्यांनी विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय अहमदनगर येथे त्यांनी सहायक प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे, मरोळ येथील रुग्णालयात सरकारी वैद्यकीय अधिकारी, वायसीएम हाॅस्पिटल पिंपरी येथे प्राध्यापक म्हणून ही काम पाहिलेले असुन सध्या ते ऐजंल पाॅलिक्नीक आणि परी नर्सिंग होम भोसरी येथे वैद्यकीय सेवा देत आहे. नुकतेच त्यांना प्रमुख पाहुणे एस के ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला व सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधिकारी मिलिंद रोकडे यांच्या हस्ते गौरवण्यात आले.मागील चार वर्षापासून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी व महाराष्ट्र ऑफिसर फोरमचे अध्यक्ष डॉ. बबन जोगदंड यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून या कार्यक्रमाचे दुबई येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एस के ग्रुपचे प्रमुख सचिन चव्हाण,दुबई येथील ड्रिम डिझाईनचे संचालक कार्तिक दुर्वासुला मीनाझ फईम, यशदामधील प्रशिक्षक डॉ.बबन जोगदंड, सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त महेंद्र रोकडे, निवृत्त सहायक पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड, तिक्षगत वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष सुगत वाघमारे व डॉ. विजय पोतदार आदी उपस्थित होते. दुबई येथील हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाचा जीवनगौरव पुरस्कार मिळवल्याबद्दल डॉ. इंगळे यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.डॉ. रविंद्र इंगळे हे मुलगी जन्माला आल्यास त्या गर्भवती महिलेची प्रसूती मोफत करून बेटी बचाव या राष्ट्रीय कार्यास हातभार लावतात. समाजातील गोरगरीब पेशंटसाठी कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्कृष्ट वैद्यकीय सुविधा देण्याचे कार्य करतात. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल ते म्हणाले की, “आजपर्यंत प्रामाणिकपणे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असलेल्या कार्याचा हा गौरव आहे या पुरस्काराने गोरगरिबांना वैद्यकीय सुविधा आणखीन कमीत कमी खर्चामध्ये उपलब्ध करून सामाजिक उत्तरदायित्व निभावण्याचे व जोमाने कार्य करण्याची ऊर्जा मिळाली. याबद्दल मी समाधानी आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page