टर्फ हब तर्फे लोणावळ्यातील महिला आणि मुलींसाठी महिला दिनाचे औचित्य साधून क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन







मावळ मराठा न्यूज – लोणावळा, टर्फ हब यांच्यावतीने लोणावळ्यातील महिला आणि मुलींसाठी महिला दिनाचे औचित्य साधून क्रिकेटच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले. नेहमी नेहमी तेच तेच खेळ तेच तेच ट्रीप याला वगळून क्रिकेटचे सामने ठेवण्यात आल्याबद्दल सर्व महिला भगिनी अतिशय खुश होत्या. या सामन्यांमध्ये सुमारे चार संघ यामध्ये सहभागी झाले होते. सहा ओव्हर ची एक मॅच याप्रमाणे मॅचेस घेण्यात आल्या. टीम धुरंदर, नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स, अरका वॉरियर्स या सर्व टीमने यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये विनर टीम धुरंदर ठरली त्यांची कॅप्टन भारती मराठे जल्लोष करीत ११ हजार रुपये रोख व चषक स्वीकारला तसेच रनर अप नाईट रायडर्स यांनी क्रमांक पटकावून सुमारे सात हजार रुपये रोख व चषक स्वीकारला. सहभागी झालेल्या सर्व संघांना प्रशस्तीपत्रक तसेच साक्षी मसाले यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर, हेप अप कंपनीतर्फे पॉपकॉर्न चे गिफ्ट हॅम्पर देण्यात आले. पहिल्या प्रत्येक मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि बॅट्स वूमन यांनाही गौरवण्यात आले. त्यांना ब्युटीफ्रेड यांच्यातर्फे कॉस्मेटिक भेट देण्यात आले. धुरंदर टीमची अक्षदा हिला वुमन ऑफ द टूर्नामेंट देऊन गौरवण्यात आले. या संपूर्ण सामन्यांसाठी आर के ज्वेलर्स व नगरसेविका दीपा मंगेश अग्रवाल यांनी सहकार्य केले. तसेच सामन्याचे समालोचन श्री तांबट सर यांनी केले व स्कोर चे काम श्री रेहान सर यांनी केले. संपूर्ण सामने यशस्वी करण्यासाठी अथर्व शिंदे, श्रेयस शिंदे, वृषाली शिंदे, प्रेम बंबोरी व मनीषा बंबोरी यांनी नियोजन केले. विशेष म्हणजे संपूर्ण सामना होईपर्यंत सर्व स्पर्धकांना प्रेक्षकांना नाष्टा, लिंबू पाणी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे सर्व महिला भगिनी अतिशय आनंदाने आठ मार्च आनंद लुटत आपापल्या घरी गेल्या.



