मावळातील पवना बंदिस्त जलवाहिनी आंदोलनातील अमानुष गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेची मानवंदना








मावळ मराठा न्युज – मावळ,दिनांक ९ ऑगस्ट २०११ रोजी झालेल्या अमानुष गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना मानवंदना देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पदाधिकारी शेजारच्या स्मृतीस्थळी उपस्थित राहून मानवंदना दिली सर्वपक्षीय बैठकीमध्ये तालुक्याचे तालुकाप्रमुख श्री आशिष जी ठोंबरे यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या सूचनेनुसार व सर्व मावळ शिवसेनेच्या वतीने स्पष्ट इशारा दिला की “शिवसेना पक्ष हा सदैव शेतकऱ्यांच्या विचारा सोबत असून शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून आघाडीने या आंदोलनामध्ये पुढाकार घेत असून कालही आजही आणि उद्याही शेतकऱ्यांची भूमिका ठामपणे निभावत असून हीच भूमिका पुढेही निवावणार अशी ग्वाही दिली आपल्याच पिंपरी चिंचवड वासीयांना पाणी मिळणार व ते नदी पाटाद्वारेच मिळणार,कोणालाही पाण्यापासून वंचित ठेवण्याची भूमिका नसून सर्वसमावेशक पद्धतीने तसेच साहेबांच्या विचाराने आपल्या बांधवांवरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही तसेच आपल्या मावळच्या जनतेवरही अन्याय होणार नाही या भूमिकेतून ठामपणे लढणार असल्याचे व आगामी काळात जरी कोणत्याही हुकूमशाहीने बळजबरीने पाणी पळविण्याचा प्रयत्न केलास त्याचा प्रथम शिवसेना रोखणार अशी ग्वाही दिली”यावेळी उपस्थित पदाधिकारी तालुका प्रमुख श्री आशिष जी ठोंबरे जिल्हा समन्वयक शांताराम जी भोते उपतालुकाप्रमुख युवराज सुतार विभाग प्रमुख संदीप झांबरे ,वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष भरत भोते वाहतूक तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेलार काँग्रेसचे अध्यक्ष यशवंतजी मोहोळ काँग्रेसचे सरचिटणीस दिलीपजी ढमाले लक्ष्मण भालेराव आरपीआय अध्यक्ष मावळ तालुका संजय विकारी, शंकर दळवी उपविभाग प्रमुख शिवसेना प्रसिद्धीप्रमुख बाळासाहेब शिंदे हे उपस्थित होते.



