*प्रकल्प “सहयोग” अंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट व ब्लँकेटचे वाटप*










मावळ मराठा न्युज -लोणावळा, दि. १० ऑगस्ट २०२६,अलीकडील अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांच्या पुढाकाराने रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटयांच्या सहकार्याने भैरवनाथ नगर, लोणावळा येथे “प्रकल्प सहयोग” अंतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना किराणा किट व ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.पूरग्रस्त नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन आवश्यक जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम राबविण्यात आला. संकटकाळात समाजातील गरजू नागरिकांच्या पाठीशी उभे राहणे आणि माणुसकीचा हात पुढे करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.या प्रकल्पास रोटरी क्लब ऑफ पिंपरी एलिटचे अध्यक्ष रो. सचिन मोरे आणि रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा रो. श्वेता रावत यांची प्रमुख उपस्थिती लाभली.यावेळी रोटरी क्लब ऑफ लोणावळाच्या अध्यक्षा रो. ॲड. मोनाली कुलकर्णी-शेलार, वरिष्ठ रोटेरियन रो. धीरुभाई, तसेच रो. रवींद्र कुलकर्णी, रो. पुंडलिक वानखेडे, रो. दिलीप पवार, रो. दुर्रिया रामपुरवाला, रो. तस्नीम भोरी, रो. नारायण शरवळे, रो. नितीन कल्याण, रो. विजया कल्याण आणि रो. जयवंत नालोडे यांच्यासह रोटरी सदस्य उपस्थित होते.या उपक्रमातून **“अडचणीच्या काळात मदतीचा हात आणि माणुसकीची साथ”हा संदेश देण्यात आला. रोटरीच्या **“Create Lasting Impact” या यावर्षीच्या संकल्पनेनुसार, समाजातील गरजू घटकांना तातडीची मदत देतानाच त्यांच्या मनात विश्वास आणि आधाराची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून करण्यात आला.**“एकत्र येऊया, मदतीचा हात देऊया आणि आपल्या समाजात कायमस्वरूपी सकारात्मक बदल घडवूया.”



