रोटरी क्लब लोणावळा कडून लोणावळा महाविद्यालय आणि ऑक्सेलियम कॉन्व्हेंट शाळेत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे लोकार्पण









मावळ मराठा न्युज -लोणावळा,जदिनांक १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी डॉ.बी एन पुरंदरे कला श्रीमती एस जी गुप्ता वाणिज्य श्रीमती एस ए मिठाईवाला विज्ञान महाविद्यालय वळवण येथे विद्यार्थिनींसाठी सॅनेटरी पॅड वेंडिंग मशीन रोटरी क्लब ऑफ लोणावळा यांनी कॉलेजला हस्तांतरित केले यामुळे विद्यार्थिनींचे आरोग्य व शारीरिक स्वच्छता राखण्यास मदत होईल.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्री राजेंद्र सोनवणे तसेच उपनगराध्यक्ष देविदास कडू व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील महाविद्यालयाचे ट्रस्टी उपाध्यक्ष श्री दत्ता पाळेकर,सचिव नीलिमा खिरे, खजिनदार श्री दत्ता येवले, फासे मम्मी, श्री ठोंबरे तसेच रोटरीच्या अध्यक्ष विजया कल्याण, पास्ट प्रेसिडेंट नितीन कल्याण, पास्ट प्रेसिडेंट रवींद्र कुलकर्णी, पास्ट प्रेसिडेंट जयवंत नलावडे,पास्ट प्रेसिडेंट पुंडलिक वानखेडे,उपाध्यक्षा मोनाली शेलार व कॉलेजचे प्राचार्य नरेंद्र देशमुख उपस्थित होते.मशिन बरोबर ५०० पेड देण्यात आले.
ऑक्सेलियम कॉन्व्हेंट शाळेत सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन हस्तांतरण दिनांक २५ मार्च रोजी ऑक्सेलियम कॉन्व्हेंट या शाळेत रोटरी क्लब ऑफ लोनावला यांनी सॅनेटरी वेंडिंग मशीन हस्तांतरित केले ही शाळा पूर्णपणे मुलींची असून पहिली ते बारावीपर्यंत वर्ग आहेत मशीन बरोबर ५०० पॅड देण्यात आले मुलींचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी हा प्रकल्प रोटरीने राबविला. यावेळी रोटरीच्या अध्यक्षा विजया कल्याण माजी अध्यक्ष नितीन कल्याण माजी अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी माजी अध्यक्ष नारायण शार वाले तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या रोटेरियन रवींद्र कुलकर्णी यांनी रोटरी क्लब विषयी विद्यार्थिनींना माहिती सांगितली तसेच हायजिनचे महत्त्व पटवून दिले मुख्याध्यापकांनी सर्वांचे आभार मानले.



