महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त लोणावळा शहर मनसेच्या वतीनेगरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तु चे वाटप

मावळ मराठा न्यूज,लोणावळा:-श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय,भागरवाडी शाळा क्र ५ येथे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तु चे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष लोणावळा शहर भारत रमेश चिकणे, माजी नगरसेवक दत्तात्रेय येवले, माजी नगरसेवक मनोज लऊलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापिका नीता पवार यांनी केले तसेच अध्यक्ष भारत चिकणे ,नगरसेवक दत्तात्रेय येवले ,मनोज लवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सौ.सुधाताई सोमण,निखिल भोसले,विनोद तिवारी ,मच्छिंद्र नेमाने ,बाळकृष्ण चिकणे,रमेश मते ,सुरेश राठोड ,निखिल सोमण ,दिनेश कालेकर ,सुनील भोंडवे ,अमित भोसले ,उमेश बोडके, विपुल माने ,रोहिदास शिंदे ,परेश वावळे हे सर्व पदाधिकारी आणि आदी मान्यवर उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page