कामशेत पोलिसांची धडक कारवाई,पेट्रोल,रॉकेल अश्या ज्वलंतशिल ८० हजार रुपये किमतीच्या द्रव्य पदार्थचा अवैद्य साठा करणाऱ्या इसमावर कारवाई

मावळ मराठा न्युज -कामशेत, दिनांक ३०/०१/२०२५ रोजी २०.३० वाजेच्या मौजे कामशेत ता. मावळ जि.पुणे हददीत इसम नामें सुभाष रतनचंद गदिया गदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता.मावळ जि.पुणे यांने गदिया कॉम्पलेक्स येथील एका खोलीत पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य ज्वलंतशिल द्रव्य पदार्थचा अवैद्य साठा करून ठेवला असले बाबत सहा पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमी दृवारा मिळालेले सदर ठिकाणी छापा कारवाई करणेबाबत आदेश झालेने सदर मिळालेले गोपनीय बातमीचे आधारे सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी मानवी जिवीतास धोका होणेचा संभव असतानाही सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता न घेता, हयगयीने व निष्काळजी पणाने अवैध साठा केलेले अत्यावश्यक वस्तु अधिनियमाचे उल्लंघन केलेने त्यावरून संबंधित इसम सुभाष रतनचंद गदिया गदिया कॉम्पलेक्स, कामशेत ता. मावळ जि.पुणे कामशेत पोलीस स्टेशनला गु.र.नं, २९/२०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियम सन २०२३ चे कलम २८७ सह अत्यावश्यक वस्तु अधिनियम सन १९५५ चे कलम ३.७ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल आहेसदर गुन्हयात घटनास्थळी मिळून आलेला ज्वलंतशील पेट्रोल सदृष्य व रॉकेल सदृष्य मालाचे वर्णन खालील प्रमाणे-१) २०,००० एक पिवळे रंगाचा अंदाजे २२० लिटर मापाचा प्लास्टिकचा बैरल त्यामध्ये अंदाजे २०० लिटर मापाचे पेट्रोल सदृष्य द्वव्य पदार्थ किंमत अंदाजे२) १८०००/-एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बैरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापाचे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे३) १८०००/-एक निळे रंगाचा अंदाजे २०० लिटर मापाचा प्लास्टिकचा बैरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापावे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे….४) १८०००/-एक लोखंडी अंदाजे २०० लिटर मापाचा सिल्वर रंगाचा बॅरल त्यामध्ये अंदाजे १८० लिटर मापावे पेट्रोल सदृष्य द्रव्य पदार्थ किंमत अंदाजे५) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे केंज त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकूण किंमत६) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रेंकित सदृष्य द्रव्य पदार्थ एकुण किंमत७) २१००/- एक निळे रंगाचे ३५ लिटर मापाचे प्लास्टिकचे कॅन त्यामध्ये ३५ लिटर मापाचे रंगहीन रॉकेल सदृष्य द्रव्य पदार्थ एकूण किंमत८०,३००/- येणेप्रमाणे वरील वर्णजावा व किंमतीचा माल जप्त केलेला आहे.सदरची कामगिरी मा.पंकज देशमुख सो, पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण तसेच अपर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे सो, सहा पोलीस अधिक्षक श्री सत्यसाई कार्तिक सो यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक, रविंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेडगे, सहा पोलीस उपनिरीक्षक नितेंद्र कदम, पोलीस अंमलदार समिर करे, पोकों/मारकड, पोकों मालवे, पोकों गारगोटे, पोकों, ठाकुर, चापोकों रविद्र राउळ तसेच तहसिल कार्यालय, वडगांव मावळ येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री तुषार तुकाराम तनपुरे व पुरवठा निरीक्षक संदिप प्रकाश तनपुरे यांचे समक्ष केलेली आहे.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page