सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराचा महाविकास आघाडीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांना सक्रिय जाहीर पाठिंबा -आण्णासाहेब कसबे



मावळ मराठा न्युज :-भोसरी,प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्यात लोकशाहीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली आहे.देशाची लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी अबाधित ठेवण्यासाठी देशाचे नेते शरद पवार साहेब, काँग्रेस आयचे नेते नानासाहेब पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा.मुखमंत्री श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, यांच्या प्रामाणिक प्रयत्नाना यश मिळवुन देण्यासाठी सकल मातंग समाज पिंपरी चिंचवड शहराचा जाहीर पाठिंबा देत आहोत असं मत सकल मातंग समाज पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे यांनी व्यक्त केले.दरम्यान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना आपल्या कडून मातंग समाजाच्या शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्नशील राहावे.१) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी प्रयत्नशील राहुन आवाज उठवावा.२) पिंपरी चिंचवड शहरातील हाफकिन महामंडळाच्या पाच एकर जागेवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने २०१४ मध्ये ठराव पास केल्या प्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ आण्णा भाऊ साठे रिचर्ड ॲन्ड डेव्हलपमेंट सेंटर (आर्टीची ) निर्मिती करण्यासाठी समाज बांधवांना मदत करावी. ही आपल्या कडून अपेक्षा व विनंती सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाने व्यक्त केली.यावेळी सकल मातंग समाज पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत दादा लोंढे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष आण्णासाहेब कसबे, समन्वयक प्रमुख डी पी खंडाळे,प्रदेश समन्वयक युवराज दाखले, समन्वयक मंगेश डाखोरे, अनिल तांबे, प्रतिक तांबे, अक्षय उदगिरे , वसंत वावरे,पैलवान विठ्ठल शिंदे, आकाश शिंदे,श्रेयश लाटकर,साहिल खान,धिरज कांबळे,गुरूदास मंचक,जी.एम.डोके , महानंदाताई कसबे, मिराताई अल्लाट, रेखाताई दुनगव आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




