निर्मिती फाउंडेशन व बंध मैत्रीचे अहिल्या विद्या मंदिर, काळाचौकी यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू विद्यार्थांना स्कूल बॅग,शूज,शैक्षणिक साहित्याचे वाटप



मावळ मराठा न्युज :-मावळ,निर्मिती फाउंडेशन व बंध मैत्रीचे अहिल्या विद्या मंदिर, काळाचौकी यांच्या संयुक्त विद्यमानाने दरवर्षी मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरात असलेल्या गरजू विद्यार्थांना शैक्षणिक पालकत्व उपक्रमाअंतर्गत स्कूल बॅग,शूज,शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येते. ह्या वर्षी ही मावळ तालुक्यातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वाटप झाले असून दिनांक ३/४/२०२४ रोजी शाळा क्रमांक ६ व शाळा क्र ९ तुंगार्ली या शाळेत स्कूल बॅग,शैक्षणिक साहित्य तसेच रेनी सॅंडल सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. ह्या वेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा मान.डॉ.सीमा शिंदे मॅडम, सभासद मानकर सर ,लोनपा नगरपालिका शाळा क्रमांक १० खंडाळा शाळेतील शिक्षिका सुचेता एखे मॅडम, आर्टिस्ट विशाल फसले, श्री प्रकाश शिंदे,श्री विशाल पाटील ह्यांच्या हस्ते वाटप झाले. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्या झाल्या नवीन बॅग, शूज, वह्या मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद दिसून येत होता.




