अभंग तुकाराम या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा उत्साहात








मावळ मराठा न्युज -आळंदी (अर्जुन मेदनकर) श्री संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थिती मध्ये अभंग तुकाराम या चित्रपटाचा संगीत लोकार्पण सोहळा प्रभादेवी, रविंद्र नाट्य मंदीर मुंबई येथे संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपटाचे मार्गदर्शक ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचा सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. . या वेळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, पावनखिंड फेम अभिनेते अजय पुरकर,दिग्दर्शक श्री दिग्पालजी लांजेकर, अभिनेत्री स्मिता शेवाळे अभिनेते योगेशजी सोमन, गायक अवधुतजी गांधी आणि इतर चित्रपट कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.



