पिंपरी चिंचवड शहराचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना पंढरपुर येथे ” राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार








मावळ मराठा न्युज नेटवर्क -पंढरपुर येथे संतराज पॅलेस , विसावा मंदीरा जवळ नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात द युवा ग्रामीण पत्रकार संघ , महाराष्ट्र राज्य आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान २०२६ मोठ्या दिमाखात पार पडला.
समाजात कला , सांस्कृतीक , क्रिडा , साहित्य , विज्ञान , आरोग्य , उद्योजकता , पर्यावरण , राजकिय , धार्मिक , आरोग्य अशा विविध क्षेत्रातील समाजकार्याची दखल घेत तसेच जीवनात आलेल्या कोणत्याही दुःखाचे किवा संकटाचे ओझे कधी जाणवु दिले नाही. संकटे येतात आणि जातात.परंतु त्यांना सामोरे जाण्याची दुर्मिळ ताकद , धैर्य आणि चिकाटी आपल्या व्यक्तीमत्वात सदैव्य दिसुन येत असल्यामुळे स्वताःच्या दुःखाची पर्वा न करता दुसर्याचे दुःख निवारण्यासाठी सदैव पुढे धाव घेण्याची वृत्ती आजही प्रेरणादायी असल्यामुळे राज्यात सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट समजला जाणारा” राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार २०२६ “ कासारवाडीचे सुपुत्र पैलवान काळुराम लांडगे यांना सन्मानिय प्रमुख पाहुणे श्री.संत शिरोमणी सावता महाराज यांचे १९ वे वंशज ह.भ.प. सावता महाराज वसेकर , पंढरपुर शहराच्या नगराध्यक्षा सौ.डॉ.प्रणिती भालके , पंढरपुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा.श्री.दशरथ वाघमोडे साहेब , पंढरपुर देवस्थानचे विश्वस्त अॅड. माधवी निगडे यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह , सन्मानपत्र व मानाचा फेटा देऊन पुरस्कार बहार करण्यात आला.
यावेळी द युवा ग्रामिण पत्रकार संघाचे संस्थापक व अध्यक्ष मा.अन्सार शेख , वनरक्षक अधिकारी मा.अनिता शिंदे , द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय महिला अध्यक्षा मा.कल्पना पवार , निर्माता दिग्दर्शक मा.अल्ताफ शेख , श्री.संतराज महाराज पवार ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. नामदेव महाराज साठे व पंढरपुर शहराचे आजी माजी नगरसेवक , पदाधिकारी , सामाजीक कार्यकर्ते भरपुर प्रमाणात होते.
कार्यक्रमाला पुरस्कार्थी व नातेवाईक तसेच नागरिकांनी भरपुर गर्दी केली होती.
कार्यक्रम संपुर्ण पारपाडण्यासाठी द युवा ग्रामीण पत्रकार संघ , महाराष्ट्र राज्य व सर्व पदाधिकारी व सदस्या यांच्या टिमने भरपुर परिश्रम घेतले.



