ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान









मावळ मराठा न्युज -लोणावळा, ज्येष्ठ नागरिक संघ, लोणावळा यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ हॉटेल चंद्रलोक येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गुरुकुल विद्यालयाचे संचालक दीपक गांगुली उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर संघाची प्रार्थना घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाच्या अध्यक्षा मृदुला पाटील यांनी केले, तर उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे दीपक गांगुली, लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख, माजी नगराध्यक्षा रेखा जोशी, माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी तसेच विद्यमान नगरसेविका रेश्मा पाठारे उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे दीपक गांगुली यांनी विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व विशद केले.कार्यक्रमाला ज्येष्ठ समाजसेवक अरविंदभाई मेहता, डॉ. नामदेव डफळ, अशोक समय, बापूलाल तारे, ज्येष्ठ पत्रकार सी. बी. जोशी, श्रीराम कुमठेकर, पांडुरंग तिखे, माजी नगरसेविका कांचन लुनावत यांच्यासह लोणावळ्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, सत्यनारायण अग्रवाल, सचिव प्रतीक्षा महाडिक, शारदा अग्रवाल, खजिनदार संध्या गाव्हले आणि राजाराम लोखंडे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शारदा अग्रवाल यांनी केले.



