विद्यार्थी व चाकरमानी यांचे साठी लोकल व एक्सप्रेस गाड्यांसंधर्भात रेल्वे प्रशासनावर मोर्चा आवश्यक – जीतूभाई टेलर


मावळ मराठा न्यूज़:- लोणावळ्याच्या सर्व राजकीय पक्ष च्या अध्यक्ष यांना विनंती आहे की प्रत्येक जण आपापल्या पक्षाने लोणावळातल्या रेल्वे स्टेशनला लोकल किंवा लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेन संदर्भात निवेदन देत आहेत, परंतु शासन कुठल्याही ठोस निर्णय घेताना दिसत नाहीत . जर सर्वपक्षांनी एकत्र येवून आणि आपल्या लोणावळा शहरासाठी व लोकांच्या हितासाठी आपण विचार केला तर नक्की शासनाला काहीना काहीतरी निर्णय घ्यावा लागेल अशी विनंती लोणावळ्यातील सर्व पक्ष प्रमुखखाना जितुभाई धीरूभाई कल्याणजी यांनी महाविकास आघाडीचे व बाकी पक्ष अध्यक्ष यांना केली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की सर्व पक्षाची मीटिंग बोलावून करून व सर्व स्थानिक लोणावळ्यातील सर्व सामाजिक संस्था त्यांनाही एकत्र बोलावून मोर्चा किंवा निवेदन द्यायची काय ती दिशा ठरवून शासनाकडून त्याची दखल घेतली जाईन जेणेकरून विद्यार्थ्याचे किंवा नोकर चाकरमानी यांचे होणारे हाल काही प्रमाणात कमी होतील.तरी कोणीतरी पुढाकार घेवून सर्वपक्षीय बैठक बोलावून काही लोकल सुरू करणे विषयी व एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळा पूर्ववत करणे संधर्भात काही निर्णय शासनास घेणे आवश्यक आहे आणि तो लोक दबावातून शक्य आहे त्यासाठी सर्व पक्षीय बैठक व्हावी अशी अपेक्षा जितु भाई टेलर यांनी मावळ मराठा न्यूज कडे केली आहे.




