आषाढी एकादशीनिमित्त MOC कॅन्सर केअर तर्फे अनोखा उपक्रम



मावळ मराठा न्युज :-दिघी,आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर दिघी येथे MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटर तर्फे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते संतोष वाळके आणि मंगेश भोसले यांच्या संकल्पनेतून घेण्यात आला , यावेळी मंदिरात आलेल्या भाविकांना कॅन्सरविषयी जनजागृती करण्यात आली. MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरचे समन्वयक शैलेंद्र वाघमारे यांनी कॅन्सरशी सामना करण्याविषयी मार्गदर्शन केले. कॅन्सर हा एक गंभीर आजार असून त्याला घाबरण्याची गरज नाही. कॅन्सरच्या निदानासाठी आणि उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य उपचार केले जातात. MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरमध्ये कमी खर्चात कॅन्सरवरील उपचार उपलब्ध आहेत. याठिकाणी डॉ.रवीकुमार वाटेगावकर आणि तज्ञ डॉक्टरांची टीम आहे जी रुग्णांना योग्य उपचार आणि समुपदेशन देते. कॅन्सरचे निदान लवकर होणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण लवकर निदान केल्यास उपचार प्रभावी ठरतात. शैलेंद्र वाघमारे यांनी या जनजागृती कार्यक्रमात कॅन्सरवरील विविध उपचारपद्धती, आहार आणि जीवनशैलीबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कॅन्सरवर मात करण्यासाठी मानसिक स्थिती मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरने केलेल्या आवाहनानुसार, गरजू रुग्णांनी पिंपरी चिंचवड येथील सेंटरमध्ये संपर्क साधावा आणि उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा. कॅन्सरमुक्त जीवनासाठी योग्य माहिती आणि उपचार घेणे आवश्यक आहे .यावेळी, शैलेंद्र वाघमारे आणि त्यांच्या परिवाराने विठ्ठल मंदिरात आलेल्या भाविकांना अल्पोपहार देऊन सेवा केली. या उपक्रमात शैलेंद्र वाघमारे, चैताली वाघमारे, इशिता वाघमारे, ईशान वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वीर, विकास शहाणे , बळवंत काळे ,अंकुश मुळे, सागर थिटे, विजय श्रीनाथ, दीपक चव्हाण, अनिल कुमार सिंग आणि श्रीनिवास सावंत यांनी सहभाग नोंदवला.




