महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिली खंडाळा येथे भेट



मावळ मराठा न्युज -खंडाळा,लोणावळा, येथे रिक्षा चालक मालकांच्या प्रश्ना समजून घेताना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी,आज खंडाळा येथे भेट दिली, आणि त्यांचे प्रश्न समजून घेतले, रिक्षा चालकांच्या प्रश्ना बाबत लगेच खंडाळा महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक इब्राहीम शेख, यांना या प्रश्ना बाबत माहिती दिली असता, त्यांनी लगेच, खंडाळा येथिल घटना स्थळी येऊन, ज्या पॉईंट बाबत समस्या आहे, त्या समजून घेऊन त्या सोडविण्या साठी, वरिष्ठ अधिकारी आणि रिक्षा चालक यांच्या बैठक आयोजित केली, आज १० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता हि बैठक होणार आहे,पोलीस उपनिरीक्षक इब्राहीम शेख, यांनी सर्व सामान्य जनतेप्रति तत्परता दाखवली त्याबद्दल रिक्षा चालक व नागरिकांनी आभार व्यक्त केले.या वेळी पोलिस हवालदार, अमित जाधव, लोणावळा नगरपालिकेचे भालचंद्र खराडे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाबूभाई शेख, लोणावळा शहर अध्यक्ष आनंद सदावर्ते आदी उपस्थित होते.




