श्रीधर पुजारी यांनी आज त्यांच्या वाढदिवशी गोर गरीबांच्या सेवेसाठी आरोग्य मित्र फाउंडेशनची स्थापना


मावळ मराठा न्यूज- लोणावळाचे माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या वाढ दिवसानिमित्त लोणावळा आणि परिसरातील गोर गरीब नागरिकांसाठी स्वस्तात आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य मित्र फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आहे यावेळी या संस्थेचे अध्यक्ष श्रीधर पुजारी सदस्य माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि सर्व कार्यकारणी यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सोबतच त्यांना या संस्थेची लोणावळा शहराला खूप आवश्यकता होती आणि तू पुजारी यांनी पूर्ण केली असल्याने त्यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. एक कार्यक्षम लोक प्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे, आरोग्य मित्र फाउंडेशनची आज त्यांनी त्यांच्या वाढदिवशी जनसेवे साठी लोकार्पण केली.त्यासाठी त्यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आई एकवीरा त्यांना गोर गरिबांच्या सेवेसाठी दीर्घ आयुष्य देवो हीच मावळ मराठा न्यूज परिवाराकडून मनापासून शुभेच्छा.




