खालापुर तालुक्यातील नडोदे गावाजवळ सुरु असलेल्या विनापरवानगी सुरुंग त्वरित थांबवावे -तुषार तु. येरुणकर








मावळ मराठा न्युज -खालापुर तालुक्यातील नडोदे गावाजवळ विनापरवानगी सुरुंग (ब्लास्टिंग) सुरु असल्याबाबत गंभीर तक्रार जिल्हाधिकारी तहसीलदार,पोलिस यांच्याकडे अनेक वेळा करून देखील अदयाप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. माजी सैनिक श्री. तुषार तु. येरुणकर यांच्या म्हणण्यानुसार काही व्यक्ती ठेकेदारांकडून नडोदे गावात विनापरवानगी सुरुंग (क्लास्टिंग) चालू आहे. या बेकायदेशीर कृत्यामुळे गावातील घरांना तडे जाणे, मालमत्तेचे नुकसान,मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास व परिसरात भितीचे वातावरण आहे या ब्लास्टिंगमुळे पर्यावरण व भूजलावर देखील गंभीर परिणाम मानवी जीवितास धोका अश्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे संबंधित प्रशासनाने याची त्वरित दखल घेत संबंधित बेकायदेशीर आणि विनापरवानगी कृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी व होणाऱ्या दुष्परिणाम त्वरित थांबवावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने तुषार येरुणकर यांनी मावळ मराठा न्युजच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे.



