लोणावळा नगरपरिषदेने सुधारित विकास आराखडासाठी ठोस कायदेशीर कारवाई करावी- नासिरभाई शेख

मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा नगरपरिषद हद्दीसाठी लागू असलेला विकास आराखडा (Development Plan) ऑगस्ट २०२६ मध्ये २० वर्षे पूर्ण करीत असून तो पुनरावलोकनासाठी पात्र झाला आहे.महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ३८ नुसार कोणत्याही नियोजन प्राधिकरणावर (Planning Authority) विद्यमान विकास आराखड्‌याचे २० वर्षांनंतर पुनरावलोकन करून सुधारित विकास आराखडा (Revised Development Plan) तयार करणे ही कायदेशीर व बंधनकारक जबाबदारी आहे. तथापि,सद्यस्थितीत लोणावळा नगरपरिषदे मार्फत सुधारित विकास आराखडा तयार करण्याबाबत कोणतीही ठोस, पारदर्शक किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू झाल्याचे सार्वजनिक नोंदीत अथवा नागरिकांच्या निदर्शनास आलेले नाही. ही बाब गंभीर स्वरूपाची असून संबंधित काय‌द्याच्या तरतुदींचे पालन न केल्याचे दर्शविते. लोणावळा शहर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून शहराचा वेगाने विकास होत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, पर्यटनामुळे वाढलेली वाहतूक, नवीन बांधकामे व पायाभूत सुविधांची गरज लक्षात घेता शहरासाठी सुयोग्य नियोजन अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने Maharashtra Regional and Town Planning Act, १९६६ मधील कलम ३८ अन्वये विकास आराखड्‌याचे पुनरावलोकन करून नवीन Development Plan तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. तसेच या अधिनियमातील कलम २१ व २२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे शहराच्या नियोजनासाठी रस्ते,सार्वजनिक सुविधा, उ‌द्याने, शाळा,रुग्णालये, पार्किंग व्यवस्था, वाहतूक नियोजन इत्यादी बाबींचा समावेश करणे गरजेचे आहे. लोणावळा शहर पर्यटनदृष्ट्या जागतिक पातळीवर ओळखले जाते. त्यामुळे शहराचा विकास आराखडा आधुनिक व नियोजनबद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. तरी लोणावळा शहरासाठी नवीन Development Plan तयार/विद्यमान Development Plan चे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरु करावी व त्याबाबतची माहिती नागरिकांसाठी जाहीर करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोणावळा शहर अध्यक्ष नासिर भाई शेख यांनी लोणावळा नगरपरिषद कडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.यावेळी प्रफुल राजपूत उपाध्यक्ष पुणे जिल्हा युवक राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष, अभय परदेशी विद्यार्थी अध्यक्ष, पूजा सुशील गुप्ता विद्यार्थिनी अध्यक्ष, रजीन शेख, ईशान सुशील गुप्ता उपस्थित होते.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page