जेष्ठ नागरिक संघ,लोणावळा,तिसावा वर्धापन दिन निमित्त जेष्ठ नागरिकांनी सेवानिवृती नंतरचे आयुष्य कसे जगावे?यांविषयी संजय कळमकर यांचे मार्गदर्शन


मावळ मराठा न्युज :-लोणावळा -१०/०४/२०२४ रोजी हॉटेल चंद्रलोक येथे लोणावळा येथील जेष्ठ नागरिक संघाचा तिसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती ज्योती भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नादब्रह्म नृत्यालयाच्या विद्यार्थीनीने कथकच्या माध्यमातून गणेश वंदना सादर करून कार्यक्रमाची सुरूवात केली. सन २०२३ -२०२४ यां काळात जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विरंगुळा केंद्रांत आणि हॉटेल चंद्रलोक येथे सातत्याने जेष्ठ नागरिक संघाच्या सदस्या साठी अनेक मनोरंजक, आरोग्य विषयक माहिती देणारे विविध कार्यक्रम राबवले जातात. लोणावळा नगरपालिका स्वच्छ भारत अभियान, वृक्षारोपण आणि इतर सामाजिक कार्यक्रमांत सहभाग घेतला जातो. तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते श्री. संजय कळमकर, नगर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी जेष्ठ नागरिकांना सेवानिवृती नंतरचे आयुष्य कसे जगावे यांविषयी आपल्या ओघवत्या शैलीतून मार्गदर्शन केले. यां कार्यक्रमासाठी खासदर श्री श्रीरंग आप्पा बारणे, श्रीमती सुरेखा ताई जाधव, माजी नगराध्यक्षा लो. न. पा, श्री. श्रीधर पुजारी , माजी उप नगराध्यक्ष, लो न पा, श्री नंदकुमार वाळुंज ,बाबूजी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, श्री प्रकाश पाठारे, अध्यक्ष आधार फाउंडेशन , लोणावळा, श्री डॉ. नामदेवराव डफळ, कोषाध्यक्ष, पुणे प्रा वि, फ़ेसकॉम , श्री अनिल गायकवाड, लायंस क्लब झोनल चेअरमन , श्री देविदास कडू, माजी नगरसेवक गट नेता भाजप, लोणावळा, श्री अरुण लाड लोणावळा शहर अध्यक्ष, भाजप आणि कार्यकर्ते, श्री व सौं गोळपकर, पत्रकार श्री कुमठेकर, पत्रकार श्री वाडेकर प्रदिप, मावळ वार्ता , श्री अनिश गनत्रा, हॉटेल चंद्रलोक चे मालक आणि समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांचा शाल ,पुष्प, तुळसी चे रोप देऊन सत्कार करण्यात आला. जेष्ठ नागरिक संघाच्या आजी, माजी अध्यक्ष, सल्लागार, कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचा ही सत्कार करण्यात आला. यां प्रसंगी जेष्ठ नागरिक संघाचे भरपूर सदस्य हजर होते, त्यांनाही गुलाब पुष्प आणि पेढा देऊन त्यांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री पांडुरंग तिखें, उपाध्यक्षा श्रीमती पाटील मृदुला, श्रीमती संध्या गव्हले, कार्यवाहक सौं सुशीला गावडे, सह कार्यवाहक अश्विनी धारप, सह कार्यवाहक श्रीमती रश्मी शिरस्कर, खजिनदार श्री गोरख चौधरी, आणि सदस्य श्रीमती शांता डिसले, श्री पांडुरंग हार्डे, श्री आत्माराम लोखंडे, श्रीमती कविता मावकर, श्री सुनील पानगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.




