अमीन वाडीवाला यांच्या लोणावळा महाविद्यालय येथे राबवलेल्या वैद्यकीय आणि विविध उपक्रमाबद्दल संस्थेकडून सन्मान







मावळ मराठा न्युज -लोणावळा,दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी ‘लोणावळा एज्युकेशन ट्रस्ट’च्या वलवण येथील लोणावळा कॉलेज च्या स्थापना दिनानिमित्त अमीनभाई वाडीवाला यांना ‘विशेष अतिथी’ म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. पराग काळकर सर यांच्या उपस्थितीत अमीन वाडीवाला यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अमीन वाडीवाला यांनी दिलेला निस्वार्थ पाठिंबा, सहकार्य तसेच विविध वैद्यकीय व इतर उपक्रमांमधील सहभागाबद्दल वाडीवाला यांचा सन्मान करण्यात आला. सन्मान आणि गौरवाबद्दल अमीन वाडीवाला यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्ता पाळेकर,नंदकुमार वाळुंज आणि इतर पदाधिकाऱ्यांचे प्राध्यापक वृंद यांचे मनःपूर्वक आभार मानले.



