*लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचा 32 वा वर्धापन दिन हॉटेल चंद्रलोक येथे थाटात संपन्न*








मावळ मराठा न्युज – लोणावळा,लोणावळा -29 एप्रिल 2026 बुधवार रोजी हॉटेल चंद्रलोक येथे ज्येष्ठ नागरिक संघ, लोणावळा यांचा 32 वा वर्धापन दिन दिमाखात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे डॉ सान्वी जेठवाणी, सह उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तृतीय पंथी हक्क व कल्याण मंडळ, अध्यक्ष, सप्तरंग सेवाभावी संस्था. बाळासाहेब सातव, राज्य प्रमुख, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक संघ, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ कल्याणकारी महासंघ पुणे जिल्हा. नंदकुमार वाळंज, बाबुजी, मावळ मुळशी भूषण, सुरेखा ताई जाधव, माजी नगराध्यक्ष, रेश्मा पाठारे, नगरसेविका, लो न पा, अनिलभाऊ गायकवाड, मंडल अध्यक्ष, भा ज पा लोणावळा, नाणे. यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, सरस्वती पूजन करण्यात आले. संघाची प्रार्थना नलिनी पुट्टोल, मंगल राणे, भाग्यश्री घोगळें यांनी सादर केली तर ज्योती भोळे यांच्या नृत्यालयातील ध्रुवी टेलर हिच्या गणेश वंदना नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सन 2025- 2026 या काळात ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विरंगुळा केंद्रात व हॉटेल चंद्रलोक येथे सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. आरोग्य तपासणी शिबिर, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, संगीत, प्रवचन, मंगळा गौरी चे खेळ अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन केले जाते.32 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बाळासाहेब सातव यांनी ज्येष्ठांचे हक्क, सरकारी योजना याची माहिती दिली.डॉ सानवी जेठवानी यांनी ज्येष्ठांनी जीवन आनंदाने कसे जगावे, काय करावे, काय करू नये या विषयी आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले . यां प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी पदाधिकारी, डॉ नामदेवराव डफळ, कोषाध्यक्ष, पुणे प्रा. वी फेस्कॉम, ब्रिन्दा गणत्रा, माजी नगरसेविका, लो न पा,अनिश गणत्रा,मालक, हॉटेल चंद्रलोक ऍड, संजय पाटील, संपादक मावळ नागरिक न्यूज, प्रदीप वाडेकर, सह संपादक मावळ वार्ता, कुमठेकर, ज्येष्ठ पत्रकार, सुनील म्हस्के, पत्रकार, पूजा गायकवाड, माजी नगरसेविका लो न पा, आशा खिलारे, माजी नगरसेविका लो न पा, आणि बरेच ज्येष्ठ, श्रेष्ठ मान्यवर उपस्थित होते त्या सर्वांना तुळशीचे रोप, शाल, पेन देऊन सत्कार करण्यात आला. समाजातील दानशूर व्यक्ती, लायन्स क्लब, रोटरी क्लब, लायन्स क्लब ऑफ सुप्रिमो अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने हजर होते. त्यांना फेटा बांधून, पेन, पेढा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, चौधरी सर, मृदुला पाटील, संध्या गव्हले, रश्मी शिरस्कर यांनी व नवीन, जुन्या कार्यकारिणी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्वांनी सहकार्य केले. रश्मी शिरस्कर यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार व्यक्त केले. पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली. सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद घेतला.



