एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी तर श्रींचे गाभाऱ्यात पुष्प सजावट लक्षवेधी

मावळ मराठा न्यूज -आळंदी,(अर्जुन मेदनकर):येथील पुत्रदा एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. परंपरेने विविध धार्मिक कार्यक्रमांतुन मंदिरात एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. पन्नास हजारावर भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. एकादशी दिनी मंदिर, नगरप्रदक्षिणा करीत भाविकांनी हरिनाम गजरात श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात लक्षवेधी पुष्प सजावटीने श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते. आळंदी ग्रामस्थ व महिला भाविकांचा इंद्रायणी आरतीस भाविकांचा प्रतिसाद मिळाला. आळंदी मंदिरात भाविकांनी पुत्रदा एकादशीस गर्दी करीत श्रींचे दर्शन घेतले. एकादशी दिनी श्रींचे मंदिरात पहाटे वेदमंत्र जयघोषात पवमान अभिषेक करण्यात आला. यावेळी आळंदी देवस्थांनचे व्यवस्थापक माऊली वीर, तुकाराम माने आदी उपस्थित होते. भाविकांना श्रींचे मंदिर दर्शनास कमी वेळेत जास्त भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांनी मंदिर परिसरात रांगा लावून दर्शन घेतले. दुपारचा महानैवेद्य, वारकरी शिक्षण संस्थेचे वतीने परंपरेने प्रवचन, रात्री धुपारती, शेजारती झाली. श्रींचे दर्शन, प्रदक्षिणा पूर्वी भाविकांनी इंद्रायणी नदी घाटावर स्नानास गर्दी केली.आळंदी मंदिरास राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायाधीश सुनील शुक्रे यांनी भेट देऊन श्रींचे दर्शन घेत मंदिरात प्रदक्षिणा करीत आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांचेशी संवाद साधला. तयानंतर देहू येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेण्यास रवाना झाले. आळंदी मंदिरात भाविकांनी धुपारतीस देखील गर्दी केली. मंदिरात परंपरेने धार्मिक उपचार श्रीची पूजा, आरती, फराळाचा महानैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम झाले. भाविकांची कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना दर्शनास सुलभ व्यवस्था व्यवस्थापक माऊली वीर यांचे नियंत्रणात करण्यात आली. यावेळी सुरक्षा रक्षक, सेवक आणि मंदिरातील बंदोबस्तावरील पोलिसांनी विशेष परिश्रम घेतले. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर यांनी सुरळीत वाहतुकीचे तसेच बंदोबस्ताचे नियोजन केले. आळंदीतील रहदारीची वर्दळ पाहता येथे वाहतुकीचे केलेले प्रभावी नियोजन यामुळे भाविक, नागरिक यांना वाहतुकीचे कोंडीतून राहत मिळाली. यामुळे आळंदीत नागरिक, व्यापारी, पोलीस मित्र यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्याचे कौतुक केले. अलंकापुरीत एकादशी निमित्त इंद्रायणी नदी घाटाची स्वच्छता ; इंद्रायणीची आरतीतीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप, राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान, महिला बचत गट सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. एकादशी दिनी इंद्रायणीच्या आरती करून नदी घाट स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, विद्या आढाव, अनिता शिंदे, उषा नेटके, चारुशीला पोटफोडे, अलका पतंगे, माजी नगरसेविका उषाताई नरके, नजमा इनामदार, लता वर्तुळे, नंदा महाडिक, अरुणा जगताप, मंगल पाटील, सुमन घूडरे, ग्यानज्योत इंग्लिश मिडीयम स्कुल संचालिका कीर्ती घुंडरे पाटील. सुनीता माने, रेखा मनुरे, उज्वला जुमले, अश्विनी धोटे, संगीता मेटे, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर, राजेश नागरे, माऊली घुंडरे, बाबासाहेब भंडारे आदीं सह मोठ्या संख्येने महिला आळंदीकर ग्रामस्थ उपस्थित होते. इंद्रायणी नदीचे पावित्र्य जोपासण्याचे आवाहन करीत इंद्रायणी नदी घाटावर आरती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम यांनी केले. इंद्रायणी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ उपाय योजना कराव्यात असे आवाहन त्यांनी केले. तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुपचे वतीने अनिता झुजम, संयोजक अर्जुन मेदनकर यांनी उपक्रमाचे आयोजन केले.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page