लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज अध्यक्ष पीएमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली टीम लोणावळा सुप्रीमोसला ६ डायमंड सर्वोच्च पुरस्कार

Y C classes

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[“local”],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“border”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

मावळ मराठा न्युज – पुणे, लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज अध्यक्ष पीएमजेएफ लायन सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली टीम लोणावळा सुप्रीमोस ने १६ आणि १७ मे २०२६ रोजी पुणे येथे आयोजित दोन दिवसीय बहुविध अधिवेशनात विविध श्रेणींमध्ये ६ डायमंड पुरस्कार(सर्वोच्च पुरस्कार श्रेणी) पटकावले आहेत.यात १) भूक निर्मूलन कार्यासाठी डायमंड पुरस्कार (सुरैया वाडीवाला )या फाईलची प्रस्तावना माननीय राजकुमार श्रीवास्तव सर (निवृत्त पोलीस अधिकारी) यांनी लिहिली होती.२) जीएसटी (सेवा) साठी डायमंड पुरस्कार (सुरैया वाडीवाला )या फाईलची प्रस्तावना माननीय घनश्याम पाटील सर (निवृत्त पोलीस अधिकारी) यांनी लिहिली होती.३) मानसिक आरोग्य आणि कल्याणासाठी केलेल्या कार्याबद्दल डायमंड पुरस्कार (सुरैया वाडीवाला )ज्याची प्रस्तावना माननीय धनराज वंजारी सर यांनी लिहिली होती (ॲडव्होकेट आणि निवृत्त पोलीस अधिकारी)४) लायन्सची प्रतिमा उभारणीसाठी डायमंड अवॉर्ड (अमीन वाडीवाला )ज्याची प्रस्तावना माननीय संजय गोविलकर सर (अतिरिक्त एसपी एसीबी) यांनी लिहिली होती.५) मार्केटिंग आणि कम्युनिकेशनसाठी डायमंड अवॉर्ड..(सुधीर भाई कदम पोर्टफोलिओ) आणि ६) मल्टिपल ३२३४ चा शायनिंग स्टार प्रेसिडेंट अवॉर्ड (सुरैया वाडीवाला )ज्याची प्रस्तावना माननीय संजय गोविलकर सर (अतिरिक्त एसपी एसीबी) यांनी लिहिली होती.१६ आणि १७ मे २०२६ रोजी हर्षल बँक्वेट्स, कोथरूड, पुणे येथे आयोजित या मल्टिपल कन्व्हेन्शन आणि पुरस्कार सोहळ्याच्या विविध समित्यांमध्ये दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि केलेल्या कार्याबद्दल लायन अमीन वाडीवाला आणि लायन सुधीर कदम यांना मल्टिपल कौन्सिलचे २ अध्यक्ष प्रशंसापत्र प्रदान करण्यात आले. माननीय जिल्हा गव्हर्नर माननीय मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन माननीय आय.डी. एंडोर्सी राज भाई आणि लायोनिझममधील आमच्या कार्याची आणि सेवेची दखल घेतल्याबद्दल सर्व परीक्षकांचे मानपासून आभार. तसेच हे सर्व पुरस्कार मिळणे केवळ टीम लोणावळा सुप्रीमोजच्या प्रत्येक सदस्याच्या सहकार्यामुळे पाठिंबा आणि सांघिक कार्यामुळेच शक्य झाले. लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज च्या सामाजिक कार्याबद्दल साप्ताहिक मावळ नागरिक परिवाराच्या वतीने अभिनंदन यापुढे ही त्यांचेकडून असेच कार्य होत राहो हीच शुभेच्छा.

Share Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page