लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने लोणावळ्यातील शिक्षकांचा सन्मान







मावळ मराठा न्युज-लोणावळा,लायन्स क्लब ऑफ लोणावळा सुप्रिमोज यांच्या वतीने दिनांक १९ सप्टेंबर २०२५ रोजी विविध शाळांमधील ७ शिक्षकांना वैयक्तिकृत आणि लॅमिनेटेड प्रशंसा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रायवूड इंटरनॅशनल स्कूलमधील अप्सरा मॅडम,सिस्टर शायनी (मुख्याध्यापक ऑक्सिलियम कॉन्व्हेंट स्कूल) आणि ऑक्सिलियम स्कूलमधील २ इतर शिक्षक, व्हीपीएस हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आणि वरिष्ठ शिक्षक,श्री आनंद गावडे सर मुख्याध्यापक डॉ. बी. एन. पुरंदरे हायस्कूल यांच्या सन्मान क्लब अध्यक्ष एमएलएफ ला. सुरैया वाडीवाला यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या उपक्रमांसाठी क्लब सेक्रेटरी ला. रंजना पुट्टोल,ला. विश्वनाथ पुट्टोल,ला. झीशान सय्यद, ला. फौजिया सय्यद,एमजेएफ लायन सुधीर कदम(डीसी मार्केटिंग अँड कम्युनिकेशन) एमजेएफ ला. अमीन वाडीवाला (डीसी) उपस्थित होते.




